जशास तसे! मविआ’त मोठी घडामोड, थेट निर्णय…  लेकाला विधान परिषदेत जागा देऊनही ठाकरेंच्या खासदाराची बंडखोरी

जशास तसे! मविआ’त मोठी घडामोड, थेट निर्णय… लेकाला विधान परिषदेत जागा देऊनही ठाकरेंच्या खासदाराची बंडखोरी

| Updated on: Jun 17, 2026 | 2:51 PM

महाराष्ट्राच राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार स्वतंत्र चूल मांडणार अशा बातम्या येत आहेत. या सहा खासदारांच्या स्वतंत्र गट स्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीत अनेक घडामोडी घडत आहेत. अशात नॉट रिचेबल असलेले खासदार नागेश आष्टीकर हे देखील ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा आहे.

महाराष्ट्राच राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार स्वतंत्र चूल मांडणार अशा बातम्या येत आहेत. या सहा खासदारांच्या स्वतंत्र गट स्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीत अनेक घडामोडी घडत आहेत. अशात नॉट रिचेबल असलेले खासदार नागेश आष्टीकर हे देखील ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा आहे. महत्त्वाची बाबत म्हणजे आष्टीकरांच्या चिरंजीवांना जागा देण्यात आल्याचं समजलं आहे. यााबाबतीत कॉंग्रेसचे खासदार रविंद्रजी चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांना अजूनही विश्वास आहे की आष्टीकर हे महाविकास आघाडीसोबतच आहेत. ‘मात्र जर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाच तर आम्ही बैठक घेऊ… उद्या निवडणूका आहेत त्यानुसार बैठक होईलच… काही तरी निर्णय घ्यावाच लागेल…’ असं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, नागेश आष्टीकर यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू असल्या तरी यासंदर्भात त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे आगामी काळात ते कोणती भूमिका घेतात, याकडे मतदारसंघासह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 17, 2026 2:50 PM
Follow Us