‘त्यांना खोक्याखाली चिरडायचंय’, संजय राऊत यांचा मालेगावात कुणावर हल्लाबोल?

‘त्यांना खोक्याखाली चिरडायचंय’, संजय राऊत यांचा मालेगावात कुणावर हल्लाबोल?

Harshada Shinkar | Updated on: Mar 26, 2023 | 8:40 PM

VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांचा संजय राऊत यांनी घेतला समाचार, बघा काय म्हणाले ?

नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मालेगावात जाहीर सभा होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे भाषण झाले. यावेळी संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि शिंदे सरकारवर निशाणा साधत शिंदेच्या शिवसेनेतील आमदारावर देखील खोचक टीका केली. ‘महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारांचे प्रश्न गंभीर आहेत, कांद्याला भाव मिळत नाहीत त्यामुळे कांदा रस्त्यावर फेकला जातो आहे, पण आपल्याला बाजूच्या सुहास कांद्याला रस्त्यावर फेकायचे आहे. गुलाबराव पाटलांना रस्त्यावर फेकायचा आहे, ज्यांनी गद्दारी केली त्या प्रत्येकाला त्याच खोक्याखाली चिरडायचं आहे’, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तर संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका करताना ही शिवसेना कुठेही वाकलेली नाही, झुकेलेली नाही अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाचा समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Mar 26, 2023 8:36 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us