‘ऑपरेशन टायगर’ची अधिकृत घोषणा कधी? मुहूर्त ठरला… थेट शिंदेच…

‘ऑपरेशन टायगर’ची अधिकृत घोषणा कधी? मुहूर्त ठरला… थेट शिंदेच…

| Updated on: Jun 18, 2026 | 1:06 PM

ठाकरे गटाच्या (शिवसेना उबाठा) 6 खासदारांच्या बंडाच्या चर्चांमुळे दिल्लीत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला हे सहाही खासदार गैरहजर राहिल्याने, या खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत हातमिळवणी करत

ठाकरे गटाच्या (शिवसेना उबाठा) 6 खासदारांच्या बंडाच्या चर्चांमुळे दिल्लीत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला हे सहाही खासदार गैरहजर राहिल्याने, या खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत हातमिळवणी करत वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत की काय? असा संशय व्यक्त केला जात होता.

आज दि.18 जून रोजी पुन्हा संसदीय दलाची बैठक बोलवण्यात आली आहे. या सहा खासदारांनी अनुपस्थिती दर्शवली. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. एकनाथ शिंदे आता मोठी घोषणा करतील अशा चर्चा आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील सहा खासदार जवळपास फुटलेच आहेत. यासंदर्भात स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माहिती देणार असून याचा मुहूर्तही ठरल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर येत्या 3 दिवसांत उपमुख्यमंत्री शिंदे पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा करतील, असे सुत्रांनी कळवले आहे. या फुटाफुटी प्रकरणी अनेक जलद घडामोडी घडत असल्याचे पहायला मिळत आहे.

Published on: Jun 18, 2026 12:49 PM
Follow Us