बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी नको, कारवाई करा! शायना एनसी यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक
ठाकरे गटाने भाजप नेत्या शायना एनसींविरोधात तीव्र आंदोलन पुकारले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याचा आरोप करत, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. शायना एनसींवर गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना प्रवक्ते पदावरून हटवण्याची मागणी संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी केली आहे. माफी ही पळवाट असून, आंदोलन सुरूच राहणार असल्याचे गटानी स्पष्ट केले आहे.
ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी भाजप नेत्या शायना एनसी यांच्या विरोधात तीव्र आंदोलन पुकारले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या कथित प्रकरणानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आज मुंबईसह ठिकठिकाणी हे आंदोलन केले जाणार असून, शायना एनसी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. या प्रकरणी केवळ माफी मागून चालणार नाही, तर आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे.
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनीही शायना एनसी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान सहन करणार नाही, असे ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे. ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी शायना एनसी यांना प्रवक्ते पदावरून हटवण्याची मागणीही केली आहे. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी “सरकारचा निषेध असो”, “खाली डोकं वर पाय” आणि “जाहीर निषेध” अशा घोषणा देत आपला संताप व्यक्त केला. जोपर्यंत शायना एनसी यांच्यावर योग्य कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.
