Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन

Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन

| Updated on: Sep 17, 2026 | 1:39 PM

छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठाकरे सेनेने मराठवाड्यातील अपूर्ण आणि बंद पडलेल्या प्रकल्पांवरुन तीव्र आंदोलन पुकारले आहे. उद्धव ठाकरे स्वतः या आंदोलनात सहभागी होणार असून, ओला दुष्काळ जाहीर करणे, शेतकऱ्यांना विमा आणि कर्जमुक्ती यांसारख्या विविध मागण्यांवर ते सरकारवर निशाणा साधणार आहेत.

मराठवाड्यातील अपूर्ण आणि बंद पडलेल्या प्रकल्पांवरुन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे सेनेने छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जनआंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वतः सहभागी होणार आहेत, ज्यामुळे या आंदोलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

ठाकरे सेनेच्या स्थानिक नेत्यांनी या आंदोलनाची गेल्या १७ दिवसांपासून तयारी केली होती. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, जसे की ओला दुष्काळ जाहीर करणे, शेतकऱ्यांना त्वरित विमा मिळणे आणि कर्जमुक्ती यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर ठाकरे सेना सरकारला धारेवर धरणार आहे. “तुमसे ना हो पाएगा” असे म्हणत ठाकरे सेनेने सरकारवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे हे केवळ आंदोलनात सहभागी होणार नाहीत, तर उपस्थितांना मार्गदर्शनही करणार आहेत. तसेच, विरोधकांनी त्यांच्या आंदोलनावर केलेल्या टीकेलाही ते उत्तर देण्याची शक्यता आहे. ज्ञानेश्वर लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे थोड्याच वेळात आंदोलनस्थळी पोहोचतील. या आंदोलनामुळे मराठवाड्यातील रखडलेल्या विकासाच्या प्रश्नांना पुन्हा एकदा वाचा फुटली आहे.

Published on: Sep 17, 2026 1:39 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us