परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदे यांचा मोठा आदेश, आता…

परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदे यांचा मोठा आदेश, आता…

| Updated on: Jun 11, 2026 | 2:26 PM

ठाण्यातील कासारवडवली परिसरात एका वृद्धाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यात थुंकल्याच्या कारणावरून एका चालकाने वृद्धावर हल्ला केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. आरोपी चालकाविरोधात कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ठाणे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

दरम्यान, या घटनेवरून मनसे नेते अविनाश जाधव यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. ओला-उबर चालकांकडून वाढत असलेल्या गैरप्रकारांविरोधात आता मनसे स्टाईलमध्ये उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. काही पदाधिकाऱ्यांसह त्यांनी परिसरात जाऊन नागरिकांशी संवाद साधला.

घटनेतील वृद्ध व्यक्ती जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नागरिकांनी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी केली आहे. सोशल मीडियावरही या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.

Published on: Jun 10, 2026 6:13 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us