दोन शाहीर मेळाव्यात भांडून लोकांचे मनोरंजन करतात. नाना पटोले यांची दसरा मेळाव्यावर टीका. यासह पहा टॉप 9 न्यूज

दोन शाहीर मेळाव्यात भांडून लोकांचे मनोरंजन करतात. नाना पटोले यांची दसरा मेळाव्यावर टीका. यासह पहा टॉप 9 न्यूज

aslam shanedivan | Updated on: Oct 06, 2022 | 9:03 PM

उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला चैतन्य होतं. तर शिंदेच्या भाषणा वेळी लोक उठून गेल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

खरी शिवसेना कोणाची हे शिवसैनिकांनी प्रस्थापित करून दिल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्या पेक्षा शिंदेच्या मेळाव्याला दुप्पट गर्दी होती असेही फडणवीस म्हणाले. तर भाजपने मोठी स्क्रिप्ट लिहून दिल्यानेच लोक शिंदेंच्या भाषणातून उठून गेल्याचे शिवसेना नेते अंबादास दानवे म्हणाले. तर उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला चैतन्य होतं. तर शिंदेच्या भाषणा वेळी लोक उठून गेल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. तर शिंदे गटाने त्यांच्या दसरा मेळाव्याला पैसे देऊन गर्दी मिळवली, अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाना साधला आहे. तर दोन शाहीर मेळाव्यात भांडून लोकांचे मनोरंजन करतात, तसे दसरा मेळावे झाले असं पटोले म्हणाले.

Published on: Oct 06, 2022 9:03 PM
Follow Us