त्रिपुऱ्यातून मोठी बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का
VIDEO | राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना एकामागून एक धक्के दिले, आता कोणता धक्का?
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली असून कोणत्याही क्षणी निकाल समोर येऊ शकतो. असे असताना सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना एकामागून एक धक्के दिल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता त्रिपुरा राज्य प्रमुख देवेंद्र प्रसाद यांनी उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी त्रिपुरा राज्य प्रमुख देवेंद्र प्रसाद याचे शिवसेना पक्षात नियुक्ती पत्र देऊन स्वागत केले आहे. त्रिपुरा राज्य प्रमुख देवेंद्र प्रसाद यांचा शिवसेनेतील प्रवेश हा ठाकरे गटाला राष्ट्रीय पातळीवरचा मोठा धक्का मानला जातोय.
Published on: Mar 25, 2023 11:20 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
