Donald Trump | नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणूक! ट्रम्पांसमोर मोठं आव्हान; हाऊस-सिनेटवर कोणाचं वर्चस्व?

Donald Trump | नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणूक! ट्रम्पांसमोर मोठं आव्हान; हाऊस-सिनेटवर कोणाचं वर्चस्व?

| Updated on: Sep 10, 2026 | 4:00 PM

अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली आहे. रिपब्लिकन पक्षाने हाऊस आणि सिनेटमध्ये विजय मिळवल्यास प्रत्येक प्रौढ नागरिकाला ५,००० डॉलर (सुमारे ४.७६ लाख रुपये) दिले जातील, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. या घोषणेने अमेरिकन राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे.

अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यामध्ये मध्यावधी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. जर रिपब्लिकन पक्षाने मध्यावधी निवडणुकीत हाऊस (प्रतिनिधी सभा) आणि सिनेट या दोन्ही सभागृहांमध्ये विजय मिळवला, तर प्रत्येक अमेरिकन प्रौढ नागरिकाला ५ हजार डॉलरचा लाभ दिला जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. हे ५ हजार डॉलर म्हणजे सुमारे ४ लाख ७६ हजार रुपये ट्रम्प डिव्हिडंड म्हणून दिले जाणार आहेत. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, हे ५ हजार डॉलर अमेरिकेतच खर्च करावे लागतील.

ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर अमेरिकन राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ चार वर्षांचा असतो. राष्ट्राध्यक्ष निवडून आल्यानंतर दोन वर्षांनी संसदेच्या आणि राज्याच्या लोकप्रतिनिधींची निवड करण्यासाठी मध्यावधी निवडणुका घेतल्या जातात. या निवडणुकांमध्ये थेट राष्ट्राध्यक्षांची निवड केली जात नाही, परंतु संसदेवर कोणाचे नियंत्रण राहील, हे या निवडणुकांमधून ठरते.

सध्याच्या परिस्थितीत, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासाठी ही एक महत्त्वाची राजकीय परीक्षा मानली जात आहे. या निवडणुकांमध्ये प्रतिनिधी सभेच्या सर्व जागांसाठी आणि सिनेटच्या सुमारे एक-तृतीयांश जागांसाठी मतदान होते. रिपब्लिकन पक्ष प्रतिनिधी सभेतील आपले अत्यंत कमी बहुमत वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर सिनेटमध्येही रिपब्लिकन पक्षाला आव्हानाचा सामना करावा लागत आहे.

 

 

Published on: Sep 10, 2026 4:00 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us