ठरलं तर मग! 18 तारखेलाच… राम मंदिर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा आक्रमक पवित्रा

ठरलं तर मग! 18 तारखेलाच… राम मंदिर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा आक्रमक पवित्रा

| Updated on: Jul 13, 2026 | 1:36 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. त्यांच्या टीकेचे प्रमुख लक्ष्य मंदिरातील ट्रस्ट आणि सत्ताधारी आहेत.

उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, . हिंदुत्वाच्या नावावर सुरू असलेल्या लुटीच्या राजकारणाविरोधात आंदोलन पुकारण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच हिंदुत्वाचा वापर केवळ राजकारणासाठी केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

रविवारी शिवसैनिकांनी दादर येथील हनुमान मंदिरासमोर महाआरतीचे आयोजन केले होते. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्येही अशाच प्रकारचे कार्यक्रम पार पडत असल्याची माहिती त्यांनी दिली.

18 तारखेला नागपूरमध्ये देखील विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. हिंदूंनी जागरूक राहण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी भाजप तसेच सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनाही रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

Published on: Jul 13, 2026 1:36 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us