न्यायामूर्तीच आरोपीला भेटतात ही लोकशाहीची हत्याच; उद्धव ठाकरे यांची नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर टीका

न्यायामूर्तीच आरोपीला भेटतात ही लोकशाहीची हत्याच; उद्धव ठाकरे यांची नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर टीका

Harshada Shinkar | Updated on: Jan 09, 2024 | 1:49 PM

राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. दोन वेळा झालेली ही भेट म्हणजे लोकशाहीची हत्या आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख आरोपी असा केला.

मुंबई, ९ जानेवारी २०२४ : शिवसेना अपात्र आमदार यांचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी देणार आहे. यापूर्वी राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. दोन वेळा झालेली ही भेट म्हणजे लोकशाहीची हत्या आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख आरोपी असा केला. उद्धव ठाकरे म्हणाले, लवादाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या रात्रीपर्यंत निकालासाठी वेळ घेतील. कदाचित त्यापेक्षा जास्त वेळ ते काढतील. ते लवाद म्हणून बसले आहेत. परंतु दोन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाऊन भेटले. न्यायमूर्ती आरोपींना जाऊन भेटण्यासारखा हा प्रकार आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे आमच्या दृष्टीने ते आरोपी आहे. आम्ही कालच यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. परंतु जनतेच्या न्यायालयातही ही बाब लक्षात आणून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. उद्या वेडावाकडा निकाल आला तर…असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Published on: Jan 09, 2024 1:49 PM
Follow Us