धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन, नेमक्या काय आहेत मागण्या?

धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन, नेमक्या काय आहेत मागण्या?

| Updated on: Nov 26, 2026 | 2:14 PM

28 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईत धारावी बचाव आंदोलन होणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पात 750 स्क्वेअर फुटाची घरे मिळावीत आणि अपात्र ठरवलेल्या कुटुंबांना पात्र ठरवावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. खासदार, आमदार आणि नगरसेवकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

28 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईतील धारावी येथे मोठे बचाव आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेने हा आवाज उठवला आहे. या आंदोलनात स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

सकाळी ११ वाजता धारावी येथे हे आंदोलन सुरू होईल. मुंबईतील शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार, नगरसेवक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे पक्षाने निर्देश दिले आहेत. हे आंदोलन कुंभारवाडा येथून सुरू होऊन अदानी एक्सपिरियन्स सेंटरपर्यंत काढण्यात येणार आहे. राज्य सरकारने 500 स्क्वेअर फुटाची घरे देण्यास मंजुरी दिली असली, तरी धारावीकर ७५० स्क्वेअर फुटाच्या घरांची मागणी करत आहेत. तसेच, प्रकल्पातून काही कुटुंबांना अपात्र ठरवण्यात आले असून, त्यांनाही पात्र करून घेण्यात यावे, अशी मुख्य मागणी या आंदोलनातून केली जाणार आहे. यापूर्वीही ठाकरेंच्या शिवसेनेने धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत अनेकदा आवाज उठवला आहे.

Published on: Nov 26, 2026 2:14 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us