मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्… विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा

| Updated on: Jun 28, 2026 | 1:39 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 6 खासदारांच्या बंडखोरीच्या चर्चांदरम्यान उद्धव ठाकरे यांनी परभणी दौऱ्याआधी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार टीका करत जनतेची माफी मागितली. “ज्यांनी विश्वासघात केला, त्यासाठी मी जनतेची माफी मागणार,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या विमान प्रवासाचाही उल्लेख केला. “फडणवीस हतबल दिसत होते. आत्मविश्वास गमावलेला जाणवत होता. त्यांचे पंख त्यांच्या स्वतःच्या लोकांकडून कापले जात आहेत,” असा दावा त्यांनी केला.

उद्धव ठाकरे यांनी भाजपमधील अंतर्गत राजकारणावरही भाष्य केले. शिवराज सिंह चौहान आणि नितीन गडकरी यांचे उदाहरण देत मोठे नेते बाजूला केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधत “गद्दारांचा शेवट कायम वाईटच होतो,” असे वक्तव्य केले.

या दौऱ्यात संजय राऊत, अरविंद सावंत आणि इतर नेतेही उपस्थित होते.

Published on: Jun 28, 2026 1:31 PM
Follow Us