जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी…वांगचूक यांच्या आंदोनाला पाठिंबा देताना ठाकरेंची केंद्रावर सडकून टीका!

जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी…वांगचूक यांच्या आंदोनाला पाठिंबा देताना ठाकरेंची केंद्रावर सडकून टीका!

| Updated on: Jul 19, 2026 | 6:15 PM

सामाजिका कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या नीट पेपरफुटी प्रकरणी पेटलेल्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा वाढत असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आंदोलन करून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. दिल्लीतील आंदोलन आणि मुंबईतील या भूमिकेमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आ हे.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सोनम वांगचूक यांचे आंदोलन सुरू असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. उपचार सुरू असतानाही त्यांनी आंदोलन मागे घेतलेले नाही. त्याच ठिकाणी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके हेही अन्नत्याग आंदोलन करत आहेत.

मुंबईतील आंदोलनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. केंद्र सरकारने त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकार पाकिस्तानशी चर्चा करण्याची तयारी दाखवते, मात्र सोनम वांगचूक यांच्याशी संवाद साधण्यासाठी वेळ देत नाही. हा योग्य दृष्टिकोन नसल्याची टीका त्यांनी केली. यावेळी ते म्हणाले, “जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी तुम्ही चर्चा करता मात्र वांगचुक यांच्याशी तुम्ही संवाद साधत नाहीत.”

Published on: Jul 19, 2026 6:15 PM
Follow Us