Donald Trump : आमचीच मध्यस्थी… भारत-पाकिस्तानचा वाद अमेरिकेने मिटवला, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुनरूच्चार; आता म्हणाले….
वाढत्या तणावादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीबाबत मध्यस्थी केल्याचे पाहायला मिळाले होते. यावर परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. युद्धबंदीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीबाबत परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले.
अमेरिकेने यशस्वी मध्यस्थी करत भारत-पाकमधला वाद मिटवला असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दोन्ही देशांकडे अत्यंत मजबूत नेतृत्व असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दोन्ही प्रमुखांना म्हणालो, वाद नको, व्यापार करू असं ट्रम्प यांनी म्हटले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद मिटवण्यामध्ये जे.डी व्हान्स, मार्को रूबियो यांची भूमिका देखील महत्त्वाची होती, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव थांबवण्यासाठी अमेरिका प्रशासनाने युद्धबंदी करून वाद मिटवला, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. ट्रम्प म्हणाले की अमेरिका प्रशासनाने हिंसाचार कमी करण्यासाठी व्यापार करारांचा वापर केला आणि दोन्ही देशांच्या नेत्यांना मजबूत असल्याचे म्हटले. दरम्यान, भारत सरकारने ट्रम्प यांचा हा दावा फेटाळून लावला होता. आणि भारत सरकारने आधीच स्पष्ट केले की, युद्धबंदीबाबत अमेरिकेसोबत व्यापारासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

