मन हेलावणारी बातमी! लगान ते गजनी… बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन

मन हेलावणारी बातमी! लगान ते गजनी… बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन

| Updated on: Aug 05, 2026 | 10:10 AM

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले आहे. ते गेल्या काही काळापासून ब्लड कॅन्सरशी झुंज देत होते. गेल्या 20 दिवसांपासून भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून, चाहत्यांसह अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे.

प्रदीप रावत यांनी राज बब्बर यांच्या ‘ऐतबार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘अग्निपथ’, ‘पत्थर के फूल’, ‘संगदिल सनम’, ‘कोयला’, ‘सरफरोश’ आणि ‘लगान’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. विविध प्रकारच्या भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले.

मात्र, त्यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळाली ती 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गजनी’ या सुपरहिट चित्रपटामुळे. या चित्रपटात त्यांनी मुख्य खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यांच्या प्रभावी अभिनयाचे प्रेक्षक आणि समीक्षकांनी भरभरून कौतुक केले होते. ‘गजनी’मधील त्यांची भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेल्या आणि लक्षात राहणाऱ्या भूमिकांपैकी एक मानली जाते.

प्रदीप रावत यांच्या निधनामुळे बॉलिवूडने एक दमदार अभिनेता गमावला असून, त्यांच्या अभिनयाचा ठसा कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहणार आहे.

Published on: Aug 05, 2026 10:10 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us