‘…त्याला मी काय करू?’; ‘खुर्ची’वरून अजित पवार यांची एकनाथ शिंदेंना कोपरखळी, बघा VIDEO तुम्हालाही हसू अवरणार नाही
राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरूहोण्यापूर्वी काल चहापानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, मात्र विरोधकांनी त्यावर बहिष्कार टाकला होता. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काल संध्याकाळी पत्रकार परिषदही पार पडली, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.
‘देवेंद्र फडणवीस आणि माझी खुर्ची बदलली पण दादांची खुर्ची मात्र फिक्स आहे’, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. आता एकनाथ शिंदे यांनी असा टोला लगावला म्हटल्यावर अजित पवार पण आपल्या हजरजबाबीपणा दाखवणार नाही असं कसं होणार… ”सरकारची नवी टर्म असली, तरी आमची टीम जुनीच आहे. फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची अदलाबदल झालेली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. पण अजितदादांची मात्र फिक्स आहे. दादांचं बरं आहे, नो टेन्शन”, असं मिश्किल भाष्य एकनाथ शिंदे यांनी केलं. मात्र एकनाथ शिंदेंनी लगावलेल्या टोल्यावर अजित पवारांनीही जशाच तसा प्रत्युत्तर दिलंय. तुम्हाला खुर्ची फिक्स ठेवता आली नाही, त्याला मी काय करू? असा खोचक सवाल करत अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना कोपरखळी लगावली. दादांच्या या वक्तव्यानंतर पत्रकार परिषदेला उपस्थित सर्वांसह एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसही पोट धरून हसू लागले. मात्र त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “ठीक आहे, आमच्यात समजूदारपणा आहे.” आणि तोच धागा पकडून फडणवीसही म्हणाले की, “आमची फिरती खुर्ची आहे.” बघा व्हिडीओ नेमकं काय-काय झालं?

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
