Vidhan Parishad | शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या नेत्यांची नावे…
सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. यामध्ये ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील हालचाली तीव्र झाल्या आहेत. शिंदे गटात विधानपरिषदेतील उपसभापती पदासाठी चांगलीच चढाओढ असल्याचं सांगितलं जात आहे. अशात मोठी अपडेट समोर येत आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज विधानपरिषदेतील उपसभापती पदाबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. उपसभापती पद हे शिंदेच्या परड्यात पडलं असून आता हे पद नेमकं कोणाला मिळेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, एकनाथ शिंदे पुन्हा धक्कातंत्र वापरतील का, अशी शक्यतादेखील आहे. दरम्यान, उपसभापती पदाच्या शर्यतीत दोन बड्या नेत्यांची नावे असल्याच्या चर्चा आहेत. यामध्ये एक चंद्रकांत रघुवंशी आहेत तर दुसरे कृपाल तुमणे आहेत. ताज्या माहितीनुसार, चंद्रकांत रघुवंशी यांना उपसभापती करण्यासाठी तब्बल नऊ जिल्ह्यातील आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवलं आहे.