AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojna | भाऊ खुर्चीवर, बहीण वाऱ्यावर! 80 लाख महिलांचा श्राप महायुतीला लागणार? वडेट्टीवारांच्या वक्तव्याने खळबळ

Ladki Bahin Yojna | भाऊ खुर्चीवर, बहीण वाऱ्यावर! 80 लाख महिलांचा श्राप महायुतीला लागणार? वडेट्टीवारांच्या वक्तव्याने खळबळ

| Updated on: Jun 01, 2026 | 11:23 AM
Share

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ‘माझी लाडकी बहीण’ योजना, वाढती महागाई आणि विविध जनकल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

लाडकी बहीण योजनेतून मोठ्या संख्येने महिलांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप करत वडेट्टीवार म्हणाले की, निवडणुकीनंतर सरकारने लाभार्थी महिलांकडे दुर्लक्ष केले आहे. सुमारे 80 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याचा दावा करत त्यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारने निवडणुकीच्या काळात महिलांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असा आरोप करत त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. या निर्णयामुळे अनेक महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली असून त्याचा राजकीय परिणाम भविष्यात दिसून येईल, असेही ते म्हणाले.

महागाई, बेरोजगारी आणि जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. आगामी निवडणुकांमध्ये जनतेसमोर हे मुद्दे प्रभावीपणे मांडले जातील, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, वडेट्टीवार यांच्या टीकेनंतर महायुतीकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 01, 2026 11:23 AM

Follow Us
IND vs ENG: रोहित शर्माचं शतक व्यर्थ, इंग्लंडने शेवटचा सामना आणि मालिकाही जिंकली.

IND vs ENG: रोहित शर्माचं शतक व्यर्थ, इंग्लंडने शेवटचा सामना आणि मालिकाही जिंकली

IND vs ENG: भारताने सामना नेमका कुठे गमावला? कर्णधार शुबमन गिलने त्या तीन षटकांचा केला उल्लेख.

IND vs ENG: भारताने सामना नेमका कुठे गमावला? कर्णधार शुबमन गिलने त्या तीन षटकांचा केला उल्लेख

दिल्लीच्या जंतर-मंतरवर रात्रीचे निदर्शक जमू लागले, चादर आणि बिछानासोबत घेऊन लोक हजर….

दिल्लीच्या जंतर-मंतरवर रात्रीचे निदर्शक जमू लागले, चादर आणि बिछानासोबत घेऊन लोक हजर…

IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंद, ठोकलं दणदणीत शतक.

IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंद, ठोकलं दणदणीत शतक

डेहराडुन येथे ‘धुरंधर’ गायिकेला चुकीचा स्पर्श, चाहत्यांच्या गर्दीत… Video.

डेहराडुन येथे ‘धुरंधर’ गायिकेला चुकीचा स्पर्श, चाहत्यांच्या गर्दीत… Video

आशिया चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानचा अवघ्या 80 सेकंदात खेळ खल्लास! MMA फायटर संग्राम सिंहने मारली बाजी.

आशिया चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानचा अवघ्या 80 सेकंदात खेळ खल्लास! MMA फायटर संग्राम सिंहने मारली बाजी