Video : पंढरपुरात सावळ्या विठुरायाच्या मंदिरात फुलांची आरास
आज माघ शुध्द जया एकादशी असल्याने पंढरपूर येथील सावळया विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या मंदिराला आकर्षक अशा रंगीबेरंगी फुलानि सजवण्यात आले आहे हि सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त सचिन चव्हाण आणि संदीप पोकळे यानी केलीय.
आज माघ शुध्द जया एकादशी असल्याने पंढरपूर येथील सावळया विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या मंदिराला आकर्षक अशा रंगीबेरंगी फुलानि सजवण्यात आले आहे हि सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त सचिन चव्हाण आणि संदीप पोकळे यानी केलीय. श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा ,,सोळखांबी,चारखांबि तसेच मंदिराच्या विविध भागाना झेंडु ,आष्टर ,ग्लेंडर , केशरी झेंडु , निळ्या रंगाचा ब्ल्यु डिजे ,पिवळा झेंडु ,कामिनी, पांढऱ्या रंगाचा टौटिस , गुलाब , शेवंती ,ड्रेसिना ,औरकेड अशा विविध आकर्षक अशा फुलांची आरास करण्यात आली आहे. यासाठी जवळपास दोन टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. विविध रंगाच्या फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे.विठुरायाचे आजचे गोजिरे रूप अधिकच खुलुन दिसत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
