महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यात किती जागांवर मतदान? तुमच्याकडचं मतदान कधी? बघा सविस्तर

महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यात किती जागांवर मतदान? तुमच्याकडचं मतदान कधी? बघा सविस्तर

Harshada Shinkar | Updated on: Mar 16, 2024 | 5:51 PM

पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकालही जाहीर होणार आहे, तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे.

नवी दिल्ली, १६ मार्च २०२४ : आगामी लोकसभेचं बिगुल वाजलं असून देशात एकूण सात टप्प्यात मतदार होणार आहे. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकालही जाहीर होणार आहे, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेतून केली. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे.

  • पहिला टप्पा – १९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
  • दुसरा टप्पा – २६ एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
  • तिसरा टप्पा -७ मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
  • चौथा टप्पा – १३ मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
  • पाचवा टप्पा – २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे.
Published on: Mar 16, 2024 5:51 PM
Follow Us