Walmik Karad Audio Clip Viral : ‘मी बीड जिल्ह्याचा बाप, चिंता काय…’; वाल्मिक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल
सायबर सेलच्या पीएसआय निशिगंधा खुळे यांच्यासोबत वाल्मिक कारडचा झालेल्या संवाद सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या ऑडिओमध्ये 'किरकोळ गुन्हा आहे. आपला पोरगा आहे. जाऊद्या द्या सोडून', असं ऐकायला मिळत आहे.
वाल्मिक कराड आणि एका महिला पोलीस अधिकाऱ्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव निशिगंधा खुळे असं आहे. तर सायबर सेलच्या पीएसआय निशिगंधा खुळे यांच्यासोबत वाल्मिक कारडचा झालेल्या संवाद सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या ऑडिओमध्ये ‘किरकोळ गुन्हा आहे. आपला पोरगा आहे. जाऊद्या द्या सोडून’, असं ऐकायला मिळत आहे. तर मी बीड जिल्ह्याचा बाप आहे. मी असल्यावर चिंता काय असाही संवाद या ऑडिओमध्ये ऐकायला मिळत आहे. दरम्यान टीव्ही ९ मराठी या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराड आणि पोलिसांमधील एक कथित संवाद व्हायरल झाला होता. आरोपीला मदत करण्यावरून हा संवाद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी ऑडिओ क्लिप संदर्भातील आरोप फेटाळले आहेत. वाल्मिक कराड आणि पोलिसांमधील कथित संवाद व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आपली प्रतिक्रया दिली आहे. व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही, याप्रकारे मी गुन्हा दाखल करणार आहे, असे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी म्हटलंय.
