LIVE Vote Counting of BMC Maharashtra Mahapalika Election Results 2026 : महापालिका निवडणूकीच्या संग्रामात कोण मारणार बाजी? पाहा लाईव्ह निकाल टीव्ही 9 मराठीवर

LIVE Vote Counting of BMC Maharashtra Mahapalika Election Results 2026 : महापालिका निवडणूकीच्या संग्रामात कोण मारणार बाजी? पाहा लाईव्ह निकाल टीव्ही 9 मराठीवर

| Updated on: Jan 16, 2026 | 8:19 AM

Watch LIVE Vote Counting of BMC Maharashtra Municipal Corporation Election Results 2026 :

राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी गुरुवार (दि.15) रोजी मतदान पार पडले. गुरुवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदारांनी सर्व उमेदवारांचे भविष्य मतपेटीमध्ये बंद केले. राज्यभरात एकूण 2,869 जागांसाठी ही निवडणूक होत असून 3 कोटी 48 लाख 79 हजार 337 मतदार मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यानंतर आज या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.

या निवडणुकीत एकूण 15 हजार 908 उमेदवार रिंगणात आहेत. मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. बहुतांश प्रभाग चार सदस्यीय असून काही प्रभाग तीन किंवा पाच सदस्यीय आहेत. प्रभागातील सदस्यसंख्येनुसार मतदारांना तितकी मते द्यावी लागणार असून ईव्हीएमवर चार वेगवेगळ्या रंगांच्या मतपत्रिका होत्या. या निवडणुकीचा निकाल आज, 16 जानेवारी रोजी जाहीर होणार आहे. तुमच्या जिल्ह्याचा निकाल तुम्ही टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर लाईव बघू शकणार आहात.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

 

Published on: Jan 16, 2026 08:19 AM