Big Breaking | बंगाल थरारलं! भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्या, आरोपाची सुई नेमकी कोणावर?

Big Breaking | बंगाल थरारलं! भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्या, आरोपाची सुई नेमकी कोणावर?

| Updated on: May 07, 2026 | 11:58 AM

अवघ्या काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. पहिल्यांदा भाजप बंगालमध्ये सत्ता स्थापन करणार असताना एक मोठी घटना घडली. ही घटना समोर येताच सर्वत्र खळबळ उडाली. पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांच्या हत्येच्या घटनेमुळे राजकीय वातावरण पेटलं आहे.

अवघ्या काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. पहिल्यांदा भाजप बंगालमध्ये सत्ता स्थापन करणार असताना एक मोठी घटना घडली. ही घटना समोर येताच सर्वत्र खळबळ उडाली. पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांच्या हत्येच्या घटनेमुळे राजकीय वातावरण पेटलं आहे. बुधवारी रात्री कोलकात्याच्या बाहेरील भागात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या प्रकरणावर भाजप नेते राहुल सिन्हा यांनी टीएमसीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलं की, निवडणुकीनंतर राजकीय तणाव वाढला असून विरोधकांना लक्ष्य करण्याचे प्रकार सुरू आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पक्षावर त्यांनी निशाणा साधत या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

दरम्यान, पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू असून या प्रकरणामागील नेमकं कारण काय, याबाबत तपास केला जात आहे. राजकीय वर्तुळात या घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात टीएमसीचा तसेच ममता बॅनर्जींच्या भाच्याचा सहभाग असल्याचे आरोप होत आहेत. मात्र, अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

Published on: May 07, 2026 11:05 AM
Follow Us