‘अतिशय हिन, गलिच्छ भाषेत माझ्या मुलीवर टीका…,’ काय म्हणाले बाळासाहेब थोरात ?

| Updated on: Oct 26, 2024 | 5:45 PM

संगमनेर येथे बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावि्रोधात भाजपाचे नेते वसंत देशमुख यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यावर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

कॉंग्रेसचे नेते काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याविरोधात भाजप नेते वसंत देशमुख यांनी अत्यंत खालच्या पातळीवरील टीका केल्याने कॉंग्रेस आणि भाजपात संगमनेर येथे मोठा राडा झाला आहे. या प्रकरणात बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रीया समोर आली आहे. राजकारणात प्रत्येकास आपले मत मांडण्याचा अधिकार असतो. लोकशाहीत मत-मतांतरे देखील असतात. परंतू पूर्वीच्या काळी एक दर्जा राखला जात होता. गेल्या पाच वर्षात ही राजकारणाची पातळी अत्यंत खालावली असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. सुजय विखे पाटील संगमनेर मध्ये आले होते. त्यांची काही दिवसातील भाषणांची भाषा अतिशय खालच्या दर्जाची होती. त्यांचा एक कार्यकर्ता उठला आणि त्यानेही अत्यंत हिन, गलिच्छ शब्दात ज्याचं वर्णन सुद्धा करू शकत नाही अशा शब्दात जयश्री यांच्या संदर्भात वक्तव्य केलं आहे. त्याचा मी निषेध करतो असे थोरात यांनी म्हटले आहे. माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे. या प्रकरणात पोलीस अजूनही आरोपीला शोधत आहेत. तो कुठं लपला आहे त्याचा शोध घेणे ही पोलिसांची जबाबदारी असल्याचेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

 

Published on: Oct 26, 2024 05:44 PM
Follow Us