‘चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,’…काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?

‘चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,’…काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?

| Updated on: Mar 21, 2026 | 5:58 PM

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याला अटक झाल्यानंतर त्याचे अनेक नेत्यांशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. चंद्रकांत पाटील यांचेही खरात यांच्यासोबत फोटो असल्याचे उघड झाले आहे. आता शिवसेनेचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांना अनेक सवाल केले आहेत.

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याला अटक झाल्यानंतर त्यांची काळे कारनामे सर्वांसमोर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अनेक राजकारण्यांशी खरात यांचे संबंध उघड झाले आहे. या भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांचेही फोटो खरात याच्यासोबत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांनी पुण्याला काळीमा फासण्याचे काम केले आहे. त्यांच्या खरात यांच्यासोबतचे फोटो पाहिले तर खरात कोणी तरी मोठा माणूस आहे आणि पाटील हात आणि खांदे खाली करुन उभे आहेत. जणू पाटील काही विधी करत आहे अशा संशय येतो आहे त्यामुळे त्यांनी या संदर्भात खुलासा करणे गरजेचे असल्याचेही रविंद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.

 

Published on: Mar 21, 2026 05:57 PM
Follow Us