मंत्रिपदाचा राजीनामा का दिला? मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा स्पष्टपणे सांगितलं कारण

मंत्रिपदाचा राजीनामा का दिला? मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा स्पष्टपणे सांगितलं कारण

Harshada Shinkar | Updated on: Feb 05, 2024 | 3:03 PM

भुजबळांच्या गौप्यस्फोटानंतर विरोधकांकडून सातत्याने असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा भाष्य करत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्यामागील कारण स्पष्ट केले आहे. छगन भुजबळ म्हणाले....

मुंबई, ५ फेब्रुवारी २०२४ : मंत्री छगन भुजबळ यांचा राजीनामा अद्याप का स्वीकारला जात नाही? भुजबळांच्या गौप्यस्फोटानंतर विरोधकांकडून सातत्याने असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा भाष्य करत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्यामागील कारण स्पष्ट केले आहे. छगन भुजबळ म्हणाले, ‘१६ नोव्हेंबर रोजी राजीनामा दिल्याचे कुणालाही माहिती नव्हते. तर एकानेही माझ्या राजीनाम्याची मागणी केली नव्हती पण १७ डिसेंबरसला अंबडमधील ओबीसी एल्गार सभेतून आपली भूमिका मांडायची होती आणि याची कल्पना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना हवी म्हणून मी आपला राजीनामा दिला. पण मी जात असताना मला वाटेत सांगितले, की या राजीनाम्याची कुठे वाच्यता करू नका, शांत रहा…पण सरकारी पक्षातील एखादा आमदार कंबरेत लाथ घालण्यापर्यंत बोलू लागला तर लोक मला काय म्हणतील…. त्यामुळे मी माझ्या राजीनाम्याची वाच्यता केली.’

Published on: Feb 05, 2024 3:03 PM
Follow Us