Vinayak Raut on MNS | शिवसेना-मनसे युती होणार का? शर्मिला ठाकरे यांच्या वक्तव्यावर शिवसेनेकडून पहिली काय आली प्रतिक्रिया?

Vinayak Raut on MNS | शिवसेना-मनसे युती होणार का? शर्मिला ठाकरे यांच्या वक्तव्यावर शिवसेनेकडून पहिली काय आली प्रतिक्रिया?

| Updated on: Aug 21, 2022 | 6:20 PM

Vinayak Raut on MNS | शिवसेना-मनसे युतीव होणार का? शर्मिला ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. काय म्हणाले राऊत पाहुयात.

Vinayak Raut on MNS | शिवसेना-मनसे युती(Shivsena-MNS Alliance) होणार का? हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ठाकरे कुटुंबियांच्या मनोमिलनाचा हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून चवीने चघळल्या जात आहे. राज ठाकरे (Raj Thackeray)आणि उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) या दोन्ही बंधुंनी एकत्र यावे यासाठी काही वर्षांपूर्वी मोहिम ही राबवण्यात आली होती. पण या पोकळ गप्पाच ठरल्या. या दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांना काही दाद दिली नाही. पण राजकारणात कोणीही अस्पृश्य नसते हे अनकेदा सिद्ध झाले आहे. शिवसेना बंडखोरीमुळे पोखरून निघाली. त्यानंतर शिवसेना पुन्हा ताकदीने भरारी मारण्याच्या प्रयत्नात आहे. शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी शिवसेना मनसे युतीवर भाष्य केले. शिवसेनेने साद दिल्यास मनसे युती होण्याचे संकेत त्यांनी दिले. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut)यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली. त्यानुसार असा विषय समोर नसल्याचे सांगत, त्यांनी या युतीवर भाष्य करण्याचे टाळले.

Published on: Aug 21, 2022 06:20 PM