उद्धव ठाकरे नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?

उद्धव ठाकरे नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?

Harshada Shinkar | Updated on: Dec 17, 2024 | 5:05 PM

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात साधारण १५ मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र या दोघांमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे अद्याप कळू शकलेले नाही.

नागपुरात कालपासून विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज हिवाळी अधिवशेनाचा दुसरा दिवस असून राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात साधारण १५ मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र या दोघांमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे अद्याप कळू शकलेले नाही. दरम्यान, या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देखील दिल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेत्यासंदर्भांत चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. तर उद्धव ठाकरे यांनी आज अचानक राहुल नार्वेकर यांचीही भेट घेतली. विधानसभेत विरोधी पक्षनेता कोणाचा असावा या संदर्भात राहुल नार्वेकर यांच्याशी भेट घेतली असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

Published on: Dec 17, 2024 5:05 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us