Yogi Adityanath : ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा – योगी आदित्यनाथ
Yogi Adityanath On Bramhos Misile : ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रम्होस मिसाइलचा वापर करण्यात आला असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हंटलं आहे.
ब्रम्होसची ताकद पाकिस्तानला विचारा, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हंटलं आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रम्होस मिसाइलचा वापर झाल्याचं देखील त्यांनी म्हंटलं आहे.
पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावलं उचलली. त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या 9 तळांना उद्ध्वस्त केलं आहे. त्यानंतर पाकिस्तानातल्या एअर डिफेन्स सिस्टीमवर देखील हल्ला करण्यात आला. या हल्ल्यांमध्ये ब्रम्होस मिसाइल वापरलं गेल्याचं विधान योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. यावेळी बोलताना आदित्यनाथ म्हणाले की, तुम्ही ब्रम्होस मिसाइलची कमाल ऑपरेशन सिंदूरमध्ये पहिली असेल. नसेल पहिली तर त्याबद्दल तुम्ही पाकिस्तानला विचारा,’ असा टोला त्यांनी लगावला.