Vidhan Parishad Election | सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत झिशान सिद्दीकींकडून उमेद‌वारी अर्ज दाखल

Vidhan Parishad Election | सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत झिशान सिद्दीकींकडून उमेद‌वारी अर्ज दाखल

| Updated on: Apr 30, 2026 | 1:27 PM

विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर काल सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध इच्छुक उमेदवारांवर चर्चा करण्यात आली. अखेर सखोल विचारविनिमयानंतर झिशान सिद्धीकी यांच्या नावावर एकमत झाले. अखेर अधिकृतपणे त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली.

विधान परिषदेसाठी झिशान सिद्धीकी यांचे नाव सुरुवातीपासूनच चर्चेत होते. मात्र, काही अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्यांची नावेही समोर येत असल्याने अंतिम निर्णय स्पष्ट झाला नव्हता. रात्री उशिरापर्यंत बैठका आणि चर्चा सुरू होत्या. अखेर पक्षाने झिशान सिद्धीकी यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली.

आता झिशान सिद्दीकी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, यावेळी सुनील तटकरे, छगन भुजवळ यांच्यासह इतर नेतेही उपस्थि होते.

Published on: Apr 30, 2026 1:27 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us