खडसे, तावडेच नव्हे, भाजपचे 18 विद्यमान आमदार घरी

मेधा कुलकर्णी, सरदार तारासिंह, राज पुरोहित, प्रकाश मेहता यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. संगिता ठोंबरे यांच्या जागी राष्ट्रवादीतून आलेल्या नमिता मुंदडा यांना तिकीट मिळालं आहे.

खडसे, तावडेच नव्हे, भाजपचे 18 विद्यमान आमदार घरी

मुंबई : भाजपने आतापर्यंत 18 विद्यमान आमदारांचा पत्ता कट (BJP No Ticket to Sitting MLA) केला आहे. विधानसभा निवडणुकांसाठी चार याद्या घोषित करत भाजपने 150 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात विनोद तावडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता यासारख्या दिग्गज आमदारांचा पत्ता कट झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

विनोद तावडे यांच्या जागी बोरीवलीतून सुनील राणे यांना तिकीट देण्यात आलं आहे. प्रकाश मेहता यांच्या जागी पराग शहा, एकनाथ खडसे यांच्या जागी कन्या रोहिणी खडसे, तर राज पुरोहित यांच्या जागी रामराजे निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे, तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागेवर अद्याप दुसरा उमेदवार दिला नसल्यामुळे त्यांना अंधुकशी आशा कायम आहे.

याशिवाय मेधा कुलकर्णी, सरदार तारासिंह यांनाही उमेदवारी नाकारण्यात (BJP No Ticket to Sitting MLA) आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरुडमधून उभं राहता यावं, यासाठी मेधा कुलकर्णींना बाजूला करण्यात आलं. संगिता ठोंबरे यांच्या जागी राष्ट्रवादीतून आलेल्या नमिता मुंदडा यांना तिकीट मिळालं आहे.

विशेष म्हणजे नंदुरबारमधील शहाद्याचे विद्यमान आमदार उदेसिंह पाडवी यांचं तिकीट कापून त्यांच्याच मुलाला संधी देण्यात आली आहे. परंतु पाडवी यांना मुलाला तिकीट दिल्याचाही राग आला आहे.

जळगावातील चाळीसगाव मतदारसंघातून विद्यमान आमदार उन्मेष पाटील यांना आपल्या पत्नीला तिकीट मिळावं, अशी आशा होती, मात्र ती मावळल्याने पाटीलही खट्टू आहेत.

विद्यमान आमदार- नवीन संधी – मतदारसंघ

1. विनोद तावडे – सुनील राणे (बोरीवली, मुंबई)
2. प्रकाश मेहता – पराग शहा (घाटकोपर पूर्व, मुंबई)
3. राज पुरोहित – राहुल नार्वेकर (कुलाबा, मुंबई)
4. एकनाथ खडसे – रोहिणी खडसे (मुक्ताईनगर, जळगाव)
5. सरदार तारासिंह – मिहीर कोटेचा (मुलुंड, मुंबई)
6. विजय काळे – सिद्धार्थ शिरोळे (शिवाजीनगर, पुणे)
7. मेधा कुलकर्णी – चंद्रकांत पाटील (कोथरुड, पुणे)
8. बाळा काशिवार – परिणय फुके (साकोली, भंडारा)
9. उदेसिंह पाडवी – राजेश पडवी (शहादा, नंदुरबार)
10. उन्मेष पाटील – मंगेश चव्हाण (चाळीसगाव, जळगाव)
11. प्रभूदास भिलावेकर – रमेश मावस्कर (मेळघाट, अमरावती)
12. चरण वाघमारे – प्रदीप पडोळे (तुमसर, भंडारा)
13. बाळासाहेब सानप – राहुल ढिकळे (नाशिक पूर्व, नाशिक)
14. सुधाकर कोठले – मोहन माटे (नागपूर दक्षिण)
15. आर. टी. देशमुख – रमेश आडासकर (माजलगाव, बीड)
16. संगिता ठोंबरे – नमिता मुंदडा (केज, बीड)
17. सुधाकर भालेराव – अनिल कांबळे (उदगीर, लातूर)

18. राजू तोडसाम – संदीप धुर्वे (आर्णी, यवतमाळ)

दरम्यान, विक्रमगडचे आमदार विष्णू सावरा यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या जागी पुत्र हेमंत सावरा यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर कसबा पेठचे आमदार गिरीष बापट खासदारपदी निवडले गेल्यानंतर त्यांच्या जागी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना संधी देण्यात आली आहे.

चौथ्या लिस्टमध्ये नाव नसलं की कसं वाटतं? विद्यार्थ्यांचे तावडेंना शालजोडे

विष्णू सावरा – हेमंत सावरा (विक्रमगड, पालघर) पुत्राला उमेदवारी
गिरीष बापट – मुक्ता टिळक (कसबा पेठ, पुणे) खासदारकी

चंद्रशेखर बावनकुळे – (कामठी, नागपूर) – अद्याप अस्पष्ट

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *