चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला पाठिंबा

शिवसेनेला आतापर्यंत 7 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 56 वरुन 63 वर पोहचलं आहे

चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला पाठिंबा
Follow us
| Updated on: Nov 03, 2019 | 2:44 PM

मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये अपक्ष आमदारांचा पाठिंबा (Independent MLAs Support) मिळवण्यासाठी चढाओढ सुरुच आहे.  जळगावातील मुक्ताईनगर मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या कन्येला पराभवाची धूळ चारणारे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. चंद्रकांत पाटील यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत पाठिंबा (Chandrakant Patil Backs Shivsena) जाहीर केला.

मुक्ताईनगरमधून भाजपने एकनाथ खडसे यांचं तिकीट कापत कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली होती. परंतु नाराज झालेल्या शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निवडणुकीत खडसेंच्या कन्येचा निसटता पराभव झाला आणि चंद्रकांत पाटील विधानसभेवर निवडून आले.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुक्ताईनगरमध्ये सभा घेत अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीच नाही, तर शिवसेना आणि भाजपमधील काही नेते-कार्यकर्त्यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यासाठी काम केल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. लेकीच्या पराभवानंतरही खडसे आपल्या मनातील खदखद जाहीरपणे बोलून दाखवत होते.

विधानसभेत आता एक नाही, तर दोन-दोन चंद्रकांत पाटील असतील. पहिले म्हणजे पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील. तर दुसरे, मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील.

शिवसेनेला आतापर्यंत 7 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 56 वरुन 63 वर पोहचलं आहे, मात्र भाजपसोबत शिवसेनेचा अजूनही 36 चाच आकडा दिसत आहे.

तर दुसरीकडे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला आहे. आतापर्यंत भाजपला एकूण 11 अपक्षांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे त्याचे संख्याबळ  105 वरुन 116 वर पोहोचले आहे.

भाजपला पाठिंबा दिलेले आमदार

  1. महेश बालदी – उरण (रायगड)
  2. विनोद अग्रवाल – गोंदिया (गोंदिया)
  3. गीता जैन – मीरा भाईंदर (ठाणे) – (भाजप बंडखोर)
  4. किशोर जोरगेवार – चंद्रपूर (चंद्रपूर)
  5. रवी राणा – बडनेरा (अमरावती)
  6. राजेंद्र राऊत – बार्शी (सोलापूर)
  7. प्रकाश आवाडे – इचलकरंजी (कोल्हापूर) (काँग्रेस बंडखोर)
  8. संजय मामा शिंदे – करमाळा (सोलापूर) (राष्ट्रवादी बंडखोर)
  9. राजेंद्र पाटील यड्रावकर – शिरोळ, कोल्हापूर (राष्ट्रवादी बंडखोर)
  10. श्यामसुंदर शिंदे – <पक्ष – शेकाप> लोहा (नांदेड) – (भाजप बंडखोर)
  11. रत्नाकर गुट्टे – <पक्ष – रासप> – गंगाखेड (परभणी)
  12. विनय कोरे – <पक्ष – जनसुराज्य पक्ष> – शाहूवाडी (कोल्हापूर)

शिवसेनेला पाठिंबा दिलेले आमदार

  1. आशिष जयस्वाल – रामटेक (नागपूर)
  2. नरेंद्र भोंडेकर – भंडारा (भंडारा)
  3. चंद्रकांत पाटील – मुक्ताईनगर (जळगाव) – (शिवसेना बंडखोर)
  4. मंजुषा गावित – साक्री, धुळे (भाजप बंडखोर)
  5. बच्चू कडू – <पक्ष – प्रहार संघटना> – अचलपूर (अमरावती)
  6. राजकुमार पटेल – <पक्ष – प्रहार संघटना> – मेळघाट (अमरावती)
  7. शंकरराव गडाख – <पक्ष – क्रांतिकारी शेतकरी पक्ष> – नेवासा (अहमदनगर)

यांचा पाठिंबा कोणाला?

  1. मनसे – 01
  2. माकप – 01
  3. एमआयएम – 02

कोणालाही बहुमत नाही

विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 पैकी 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या, राष्ट्रवादी 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 जागांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे सत्ता स्थापन्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे.

आघाडीकडून मंत्रिपद भूषवलेल्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 पक्षीय बलाबल (Maharashtra Vidhansabha Election Partywise Result)

  • भाजप – 105
  • शिवसेना – 56
  • राष्ट्रवादी – 54
  • काँग्रेस – 44
  • बहुजन विकास आघाडी – 03 (महाआघाडी)
  • प्रहार जनशक्ती – 02 (शिवसेनेला पाठिंबा)
  • एमआयएम – 02
  • समाजवादी पक्ष – 02 (महाआघाडी)
  • मनसे – 01
  • माकप – 01
  • जनसुराज्य शक्ती – 01 (भाजपला पाठिंबा)
  • क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01 (शिवसेनेला पाठिंबा)
  • शेकाप – 01 (भाजपला पाठिंबा)
  • रासप – 01 (भाजपला पाठिंबा)
  • स्वाभिमानी – 01 (महाआघाडी)
  • अपक्ष – 13
  • एकूण – 288

महायुती – 162

(भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)

महाआघाडी – 105

(राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01) <भाजपला पाठिंबा>, स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)

Chandrakant Patil Backs Shivsena

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.