... तर मी शिवसेनेला मदत करेन : लक्ष्मण माने

वंचित बहुजन आघाडीचे (VBA) बंडखोर नेते लक्ष्मण माने (Laxman Mane) यांनी आता नवी राजकीय भूमिका घेतली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) नेतृत्त्वात वंचित बहुजन आघाडी भाजप (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) मदत करत असल्याचा आरोप करत ते वंचितमधून बाहेर पडले होते.

... तर मी शिवसेनेला मदत करेन : लक्ष्मण माने

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे (VBA) बंडखोर नेते लक्ष्मण माने (Laxman Mane) यांनी आता नवी राजकीय भूमिका घेतली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) नेतृत्त्वात वंचित बहुजन आघाडी भाजप (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) मदत करत असल्याचा आरोप करत ते वंचितमधून बाहेर पडले होते. मात्र, आता त्यांनी शिवसेना (Shivsena) आणि आपले काही वावडे नसल्याचं म्हणत शिवसेनेशी जुळवून घेण्याची तयारी दाखवली आहे.

लक्ष्मण माने यांनी सोमवारी (9 सप्टेंबर) सोलापुरात पत्रकार परिषद घेत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत (Assembly Election) भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “प्रबोधन ठाकरे हे आमच्या चळवळीचे नेते आणि माझे गुरु होते. त्यांचा मुलगा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चूक केली. मात्र, नातवंडे सुधारत असतील तर त्यांना मदत करण्याची माझी तयारी आहे.”

ईव्हीम मशीनबाबत अनेकवेळा तक्रारी केल्या, आंदोलनं करूनही काही फरक पडत नाही. त्यामुळे आता कायदेशीर आंदोलनाचा नवा प्रयोग करण्यात येणार असल्याचं लक्ष्मण मानेंनी सांगितलं. निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात 100 ते 300 अपक्ष उमेदवार राहणार आहेत. त्यामुळे ईव्हीम मशीनला मर्यादा येणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *