AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन तृतीयांश आयारामांना मतदारांनी घरी बसवलं!

तिकीटासाठी दुसऱ्या पक्षात गेलेल्या जयदत्त क्षीरसागर, दिलीप सोपल, रश्मी बागल यासारख्या आयारामांना मतदारांनी नाकारलं.

दोन तृतीयांश आयारामांना मतदारांनी घरी बसवलं!
| Updated on: Oct 24, 2019 | 8:33 PM
Share

मुंबई : निवडणुकांच्या तोंडावर तिकीटासाठी उड्या मारणं नवीन नाही. विधानसभेच्या इतिहासात गेल्या पाच वर्षांच्या टर्ममध्ये सर्वाधिक आमदारांनी राजीनामा देण्याचा विक्रम झाला. तब्बल तीसपेक्षा जास्त जणांनी आमदारकीचा राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला. तिकीटासाठी दुसऱ्या पक्षात गेलेल्या जवळपास दोन तृतीयांश आयारामांना (Incoming Outgoing for Candidature) मतदारांनी नाकारलं, तर राधाकृष्ण विखे पाटील, नितेश राणे, कालिदास कोळंबकर यासारख्या डझनभर नेत्यांनाच पक्षबदलानंतरही आमदारकी टिकवता आली. वैभव पिचड, अमल महाडिक, हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या 20 आयाराम नेत्यांना मतदारांनी आस्मान दाखवलं.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जवळपास 30 आयारामांना तिकीट (Incoming Outgoing for Candidature) मिळालं होतं. यातील निम्मी तिकीटं तर भाजपने आयात नेत्यांना दिली होती, तर शिवसेनेनेही विद्यमानांना डावलून जवळपास दहा आयारामांना उमेदवारी दिली होती.

राष्ट्रवादीतून आलेले भाजपचे तिकीटधारक

बबनराव पाचपुते – राष्ट्रवादी ते भाजप – श्रीगोंदा, अहमदनगर – विजयी राणा जगजितसिंह पाटील – राष्ट्रवादी ते भाजप – तुळजापूर, उस्मानाबाद – विजयी नमिता मुंदडा – (आमदार नाही) – राष्ट्रवादी ते भाजप – केज, बीड विजयी वैभव पिचड – राष्ट्रवादी ते भाजप – अकोले, अहमदनगर – पराभूत

काँग्रेसमधून आलेले भाजपचे तिकीटधारक

जयकुमार गोरे – काँग्रेस ते भाजप – माण, सातारा विजयी कालिदास कोळंबकर – काँग्रेस ते भाजप – वडाळा, मुंबई विजयी राधाकृष्ण विखे पाटील – काँग्रेस ते भाजप – शिर्डी, अहमदनगर विजयी नितेश राणे – काँग्रेस ते भाजप – कणकवली, सिंधुदुर्ग विजयी काशिराम पावरा – काँग्रेस ते भाजप – शिरपूर, धुळे विजयी रवीशेठ पाटील – काँग्रेस ते भाजप – पेण, रायगड – विजयी शरद पवारांची साथ सोडलेल्या आमदारांचं काय झालं?

अमल महाडिक – काँग्रेस ते भाजप- कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर पराभूत गोपालदास अग्रवाल – काँग्रेस ते भाजप – गोंदिया, गोंदिया पराभूत हर्षवर्धन पाटील – माजी आमदार – काँग्रेस ते भाजप – इंदापूर, पुणे – पराभूत मदन भोसले – माजी आमदार – काँग्रेस ते भाजप – वाई, सातारा – पराभूत भरत गावित – काँग्रेस ते भाजप – नवापूर, नंदुरबार – पराभूत

राष्ट्रवादीतून आलेले शिवसेनेचे तिकीटधारक (Incoming Outgoing for Candidature)

भास्कर जाधव – राष्ट्रवादी ते शिवसेना – गुहागर, रत्नागिरीविजयी पांडुरंग बरोरा – राष्ट्रवादी ते शिवसेना – शहापूर, ठाणे – पराभूत दिलीप सोपल – राष्ट्रवादी ते शिवसेना – बार्शी, सोलापूर – पराभूत जयदत्त क्षीरसागर – राष्ट्रवादी ते शिवसेना – बीड, बीड – पराभूत रश्मी बागल – (आमदार नाही) – राष्ट्रवादी ते शिवसेना – करमाळा, सोलापूर – पराभूत शेखर गोरे – (आमदार नाही) – राष्ट्रवादी ते शिवसेना – माण, सातारा – पराभूत

काँग्रेसमधून आलेले शिवसेनेचे तिकीटधारक

अब्दुल सत्तार – काँग्रेस ते शिवसेना – सिल्लोड, औरंगाबाद – विजयी भाऊसाहेब कांबळे – काँग्रेस ते शिवसेना – श्रीरामपूर, अहमदनगर – पराभूत निर्मला गावित – काँग्रेस ते शिवसेना – इगतपुरी, नाशिक – पराभूत दिलीप माने – माजी आमदार – काँग्रेस ते शिवसेना – सोलापूर मध्य, सोलापूर – पराभूत विलास तरे – बविआ ते शिवसेना – बोईसर, पालघर – पराभूत शरद सोनावणे – मनसे ते शिवसेना – जुन्नर, पुणे – पराभूत tv9marathi.com (Incoming Outgoing for Candidature)

उलटी गंगा

भारत भालके – काँग्रेस ते राष्ट्रवादी – पंढरपूर, सोलापूर विजयी आशिष देशमुख – भाजप ते काँग्रेस – नागपूर दक्षिण पश्चिम – पराभूत उदेसिंह पाडवी – भाजप ते काँग्रेस – शहादा, नंदुरबार – पराभूत बाळासाहेब सानप – भाजप ते राष्ट्रवादी – नाशिक पूर्व, नाशिक – पराभूत

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.