हे सरकार घालवा, नाही तर बँकेतील उर्वरित पैसेही मोदी काढून घेतील : प्रकाश आंबेडकर

विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकरांची जालनाच्या घनसावंगी येथे सभा झाली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी मोदी सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

हे सरकार घालवा, नाही तर बँकेतील उर्वरित पैसेही मोदी काढून घेतील : प्रकाश आंबेडकर
Follow us
| Updated on: Oct 15, 2019 | 8:05 AM

जलना : ‘या निवडणूकीत मी जिंकलो, तर पूर्ण देशाचं राजकारण बदलेल’, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला (VBA Prakash Ambedkar). तसेच, हे सरकार घालवले नाही, तर मोदी तुमच्या बँक खात्यातील 90 टक्के रक्कम काढून घेईल, असा टोलाही त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी लगावला (Prakash Ambedkar and PM Modi). विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकरांची जालनाच्या घनसावंगी येथे सभा झाली. वंचितचे घनसावंगी मतदारसंघाचे उमेदवार विष्णू शेळके यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती (Prakash Ambedkar Ghansawangi rally).

आपण घराणेशाही विरोधात बोलतो, त्यांच्या येथेही घराणेशाही आहे. उमेदवारांना दुसऱ्याच्या बॅग उचलण्याच्या पलीकडे दुसरा मार्गच नाही. ना सन्मान, ना मान, ना सत्ता आणि म्हणून महाराष्ट्राची निवडणूक अलुतेदार आणि बलुतेदार यांच्या दृष्टीने महत्वाची असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं. आम्ही सत्तेत येण्याचा प्रयत्न केला, पण ते जमले नाही. पण यावेळेस मात्र, उमेदवारी मिळाली, संघटन मिळाले आणि मदतही मिळाली त्यामुळे आता संधीचं सोनं करण्याची वेळ आली असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं.

ही निवडणूक महत्वाची आहे, इथली दृष्टी बदलायची आहे. जे सगळे उमेदवार आम्ही उभे केले, ती माणसं आहेत, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी वंचितला निवडूण देण्याचं आवाहन केलं.

तसेच, ‘हे सरकार (भाजप सरकार) घालविलं नाही, तर मोदी तुम्हाला 15 लाख रुपये तर देणार नाहीच, उलट तुमच्या बँकेत जेवढे पैसे आहेत, त्यापैकी 90 टक्के घेतल्याशिवाय राहणार नाही’, अशी खोचक टीका प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारवर केली.

या सभेत प्रकाश आंबेडकरांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. ‘देवेंद्र फडणवीस म्हणतात 240 जागा निवडून आल्याशिवाय आम्ही थांबत नाही. अरे बाबा, तुम्ही कुठले ज्योतिषी आहात का? देवेंद्र फडणवीस आपण हे शास्त्र कधी शिकला, तुम्हाला या शास्त्राने शिकवले, की ईव्हीएमच्या शास्त्राने शिकवले’, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांसाठीच काम करणार, भाजप बंडखोराचा फडणवीस सरकारला पाठिंबा

ऐन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का, आमदार रामराव वडकुते यांचा राजीनामा

स्मृती इराणी आणि भिडे गुरुजींची भेट, राजकीय चर्चांना उधाण

महाराजसाहेब विरोध तुम्हाला नाही, महाराष्ट्राच्या छातीवर वरवंटा फिरवणाऱ्यांना : अमोल कोल्हे

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.