साताऱ्याच्या गादीचा आदर ठेवला नाही, जनतेने कौल दिला : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येताच पत्रकार परिषद घेत जनतेने दिलेल्या जनमताबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

Sharad Pawar on Udayanraje Bhosale, साताऱ्याच्या गादीचा आदर ठेवला नाही, जनतेने कौल दिला : शरद पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येताच पत्रकार परिषद घेत जनतेने दिलेल्या जनमताबद्दल आभार व्यक्त केले आहेत. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह आघाडीतील सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्याचं सांगत त्या सर्वांचे देखील आभार मानले. यावेळी शरद पवारांनी (Sharad Pawar on Satara Loksabha ByPoll) सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांना (Sharad Pawar on Udayanraje Bhosale) देखील टोला लगावला. उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याच्या गादीचा आदर ठेवला नाही. सातारकरांनी कौल देत यावर शिक्कामोर्तब केला आहे.

शरद पवार म्हणाले, “विधानसभा निवडणुकीसोबत एकच लोकसभेची जागा होती. त्याकडे सर्वांचेच लक्ष होते. साताऱ्यात लोकांवर कारण नसताना लोकसभा निवडणूक लादली गेली. त्यामुळे साताऱ्याच्या जनतेने त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात साताऱ्याच्या गादीबद्दल आदर आहे. आम्हाला देखील साताऱ्याच्या गादीबद्दल आदर आहे. मात्र, गादीवरील लोकांनी हा आदर कायम  ठेवला नाही. त्यामुळे जनतेने हा कौल दिला आहे. साताराच्या जनतेने श्रीनिवास पाटील यांच्यासारख्या अनुभवी राजकारण्याला विजयी केले. त्याबद्दल मी साताऱ्याच्या जनतेचे आभार मानतो. साताऱ्यात जाऊन मी सातारकरांचे आभार मानणार आहे.”

विधानसभा निवडणुकीतील निकालातून जनतेला सत्तेचा उन्माद आवडला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सत्ता दिल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी जमिनीवर राहून काम करायचं सोडून सत्तेचा उन्माद केला. याला लोकांना अमान्य केलं आहे. तसेच पक्षांतराला देखील लोकांनी पसंती दिली नाही. अपवाद वगळता प्राथमिक स्तरावर पक्षांतर केलेल्या नेत्यांना जनतेने नाकारले आहे, असंह शरद पवार यांनी नमूद केलं.

‘भविष्यात नव्या पिढीला सोबत घेऊन नवं नेतृत्व तयार करणार’

शरद पवार म्हणाले, “या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या आणि पराभूत झालेल्या सर्वच उमेदवारांची एक बैठक घेऊन कामाचा आढावा घेणार आहे. आता दिवाळी आहे. त्यामुळे ही बैठक दिवाळीनंतर घेतली जाईल आणि त्यात पुढील कृतीकार्यक्रम ठरवला जाईल. भविष्यात नव्या पिढीला सोबत घेऊन नवं नेतृत्व तयार करण्यासाठी काम करण्याचा विचार आहे. त्याची सुरुवात माझ्यापासूनच करणार आहे.”

या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून 220 पेक्षा अधिक जागा येईल, असं वातावरण तयार करण्यात आलं होतं. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाआघाडीच्या इतर मित्रपक्षांनी जी मेहनत घेतली त्याला यश आलं आहे. आमचा प्रयत्न यापेक्षाही पुढे जाण्याचा होता. मी या यशाबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे आभार मानतो, असंही शरद पवार म्हणाले.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *