AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचे 22, शिवसेनेचे 8, ‘हे’ आहेत पत्ता कट झालेले 36 विद्यमान आमदार

सुमार कामगिरी किंवा नव्या चेहऱ्याला संधी, अशा विविध कारणांमुळे पत्ता कट झालेल्या महाराष्ट्रातील सर्वपक्षीय विद्यमान (2014-2019) आमदारांची यादी

भाजपचे 22, शिवसेनेचे 8, 'हे' आहेत पत्ता कट झालेले 36 विद्यमान आमदार
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Oct 10, 2019 | 1:34 PM
Share

मुंबई : विधानसभा निवडणुकीत तब्बल 36 विद्यमान आमदारांची तिकीटं कापण्यात आली आहेत. कुठे नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी प्रस्थापितांना डावलण्यात आलं, तर कुठे सुमार कामगिरीमुळे पत्ता कट (Sitting MLAs Candidature Rejected) करण्यात आला. वरळीत आदित्य ठाकरे यांच्या लाँचिंगसाठी विद्यमान आमदार मागे हटला, तर कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील यांना जागा देण्यासाठी नाराजी लपवत मेधा कुलकर्णी प्रचारात उतरल्या आहेत. कोणी आपल्याच नातेवाईकासाठी जागा सोडली, तर एकनाथ खडसेंना डावलून मुलीला तिकीट देण्यात आलं. भाजपने 22, तर शिवसेनेने 8 विद्यमान आमदारांना घरी बसवलं.

पत्ता कट झालेल्या विद्यमान आमदारांची संपूर्ण यादी

भाजप – 22

शहादा, नंदुरबार – उदेसिंह पाडवी (भाजप) – त्यामुळे काँग्रेसच्या तिकीटावर चाळीसगाव, जळगाव – उन्मेष पाटील (भाजप) मुक्ताईनगर, जळगाव – एकनाथ खडसे (भाजप) – मुलगी रोहिणी खडसे यांना तिकीट मेळघाट, अमरावती – प्रभूदास भिलावेकर (भाजप) नागपूर दक्षिण, नागपूर – सुधाकर कोठले (भाजप) कामठी, नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) तुमसर, भंडारा – चरण वाघमारे (भाजप) भंडारा, भंडारा – रामचंद्र अवसारे (भाजप) tv9marathi.com साकोली, भंडारा – बाळा काशिवार (भाजप) आर्णी, यवतमाळ – राजू तोडसाम (भाजप) उमरखेड, यवतमाळ – राजेंद्र नजरधने (भाजप) विक्रमगड, पालघर – विष्णू सावरा (भाजप) – मुलगा हेमंत सावरा यांना तिकीट कल्याण पश्चिम, ठाणे – नरेंद्र बाबूराव पवार (भाजप) – शिवसेनेला जागा बोरीवली, मुंबई – विनोद तावडे (भाजप) मुलुंड, मुंबई – सरदार तारासिंह (भाजप) tv9marathi.com घाटकोपर पूर्व, मुंबई – प्रकाश मेहता (भाजप) कुलाबा, मुंबई – राज पुरोहित (भाजप) शिवाजीनगर, पुणे – विजय काळे (भाजप) कोथरुड, पुणे – मेधा कुलकर्णी (भाजप) – चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीसाठी माजलगाव, बीड – आर. टी. देशमुख (भाजप) केज, बीड – संगिता ठोंबरे (भाजप) – आयात नमिता मुंदडा यांना तिकीट उदगीर, लातूर – सुधाकर भालेराव (भाजप)

शिवसेना – 08

चोपडा, जळगाव – चंद्रकांत सोनावणे (शिवसेना) ऐवजी पत्नी लता सोनावणे नांदेड दक्षिण, नांदेड – हेमंत पाटील (शिवसेना) पालघर, पालघर – अमित घोडा (शिवसेना) कल्याण ग्रामीण, ठाणे – सुभाष भोईर (शिवसेना) tv9marathi.com भांडुप पश्चिम, मुंबई – अशोक पाटील (शिवसेना) वांद्रे पूर्व, मुंबई – तृप्ती सावंत (शिवसेना) – महापौरांना तिकीट, सावंत यांची अपक्ष बंडखोरी वरळी, मुंबई – सुनिल शिंदे (शिवसेना) – आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी करमाळा, सोलापूर – नारायण पाटील (शिवसेना) – आयात रश्मी बागल यांना तिकीट

पत्ता कट झालेले महाआघाडीचे आमदार (Sitting MLAs Candidature Rejected)

काँग्रेस 03

नवापूर, नंदुरबार – सुरुपसिंग नाईक (काँग्रेस) भोकर, नांदेड – अमिता चव्हाण (काँग्रेस) – पती अशोक चव्हाण यांना तिकीट लातूर ग्रामीण, लातूर – त्र्यंबक भिसे (काँग्रेस) – धीरज देशमुख यांना तिकीट

tv9marathi.com

राष्ट्रवादी 03

पुसद, यवतमाळ – मनोहर नाईक (राष्ट्रवादी) – मुलगा इंद्रनिल मनोहर नाईक यांना तिकीट श्रीगोंदा, अहमदनगर – राहुल जगताप (राष्ट्रवादी) चंदगड, कोल्हापूर – संध्यादेवी कुपेकर (राष्ट्रवादी)

संबंधित इंटरेस्टिंग बातम्या :

विधानसभा निवडणूक 2019 : महाराष्ट्रातील 40 लक्षवेधी लढती

नातेवाईक vs नातेवाईक | कुठे सख्खे भाऊ, कुठे काका-पुतणे रिंगणात

नवे आहेत पण छावे आहेत, राजकीय घराण्यांची युवा पिढी मैदानात

विधानसभेची आयपीएलसारखी स्थिती, उमेदवार तोच, फक्त पक्ष वेगळा!

 

Follow Us
आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो
मोठी बातमी! आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो क्लीपने खळबळ
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... ठाकरेंच्या वकिलांच्या दाव्याने..
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... वकिलांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही...
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही... शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने खळबळ
आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा
मोठी बातमी! आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा, मात्र शिवसेना कुणाची? ह्यावर सस्पेन्स कायम
अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
Shivsena SC Hearing | सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा मोठा दावा! अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... डार्क वेबचा वापर करून कट?
Nagpur | मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेकाचं भयनाक कृत्य
विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; कोर्टात सिब्बल यांचा युक्तिवाद
Shivsena Symbol Hearing Update | विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा सडेतोड युक्तिवाद
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल
विधिमंडळ स्तरावर शिंदेंकडे बहुमत होतं, मात्र... कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाने डाव पलटणार?
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीत
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीती