शिवसेना आमदाराला भाजपकडून 50 कोटींची ऑफर : वडेट्टीवार

शिवसेनेच्या एका आमदाराला 50 कोटींची ऑफर भाजपने दिली असून काँग्रेसच्या आमदारांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, असा दावा विजय वडेट्टीवारांनी केला आहे

शिवसेना आमदाराला भाजपकडून 50 कोटींची ऑफर : वडेट्टीवार

मुंबई : शिवसेनेच्या आमदाराला भाजपने 50 कोटींची ऑफर दिली, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. काँग्रेसच्या आमदारांशीही भाजपने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar on BJP Offer) दिली.

काही आमदारांशी संपर्क करुन प्रलोभन द्यायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या एका आमदाराला 50 कोटी रुपयांची खुली ऑफर दिल्याचं मी टीव्ही चॅनलवर पाहिलं. त्यानंतर आमच्या आमदारांनाही संपर्क करण्यात आला, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

पक्षांतर करणाऱ्या 80 टक्के माजी आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला. हा धडा सगळ्यांनी घेतला आहे. त्यामुळे पक्ष सोडण्याची आता कोणाची हिंमत होणार नाही, असंही वडेट्टीवार यांना वाटतं.

अशाप्रकारे मित्रपक्षाच्या आमदारावरच त्यांचा डोळा आहे. याचा अर्थ ते काहीही करु शकतात. त्यांनी आमच्या आमदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, ही गोष्ट 100 टक्के खरी आहे, असंही विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना प्रवेशासाठी मला आतापर्यंत 25 फोन आलेत : विजय वडेट्टीवार

हा सत्तेचा घोडेबाजार उघड झाला पाहिजे म्हणून मी आमदारांना सांगितलं फोन टॅप करा. हे पुरावे जनतेसमोर दाखवायचे आहेत, असंही वडेट्टीवार म्हणाले.

आम्ही आमच्या आमदारांना कुठेही पाठवलेलं नाही. काही आमदार फिरायला गेले असतील जयपूरला. निवडणुकीचा शीण घालवण्यासाठी ते गेले असतील, असं म्हणत काँग्रेस आमदारांना राजस्थानात हलवल्याचं वृत्त वडेट्टीवारांनी फेटाळलं.

सत्तास्थापनेच्या वेळी आमदारांची फोडाफोड टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून काँग्रेसने 30 ते 35 आमदारांना जयपूरला पाठवल्याची माहिती आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे, तर काही नेते दिल्लीत हायकामंडला भेटायला जाणार आहे. सत्तास्थापनेतील तिढा आणि शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेस नेत्यांची चर्चा होण्याची चिन्हं आहेत.

हे सत्तेच्या ठिकाणी मुंगळ्यासारखे चिकटून बसले आहेत. सत्तेचा काय तमाशा चालवलाय कळत नाही, अशा शब्दात वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar on BJP Offer) भाजपवर घणाघात केला.


निवडणुकांपूर्वीही वडेट्टीवारांचा दावा

‘शिवसेनेकडून पक्षांतरासाठी वारंवार फोन येत आहेत. एक विरोधी पक्ष नेता (राधाकृष्ण विखे पाटील) भाजपमध्ये गेला म्हणून दुसरा विरोधी पक्ष नेता शिवसेनेला त्यांच्या पक्षात न्यायचा आहे. मला वांद्रेहून आतापर्यंत 25 फोन आले आहेत आणि भेटायला बोलावत आहे, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी ऑगस्ट महिन्यात म्हणजेच विधानसभा निवडणुकांपूर्वी केला होता.

फोडाफोडीची भीती, महाराष्ट्रातील आमदारांना काँग्रेसने सत्ता असलेल्या राज्यात हलवलं!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *