AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli Net Worth : हॅपी बर्थडे विराट ! किंग कोहलीची संपत्ती किती ? कुठून करतो कमाई ?

भारतीय क्रिकेट विश्वातील मोठं नाव असलेला विराट कोहली याची सर्वत्र चर्चा असते. सध्याच्या काळाता तो कमाईच्या बाबतीत जगभरातील श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीत वरच्या स्थानावर आहे. तो एखाद्या सेलिब्रिटीपेक्षाही अधिक कमाई करताना दिसतो. त्याचं एकूण नेटवर्थ, आलिशान आयुष्य, त्याच्याकडे किझी आलिशान गाड्या आहेत... वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया.

Virat Kohli Net Worth : हॅपी बर्थडे विराट ! किंग कोहलीची संपत्ती किती ? कुठून करतो कमाई ?
विराट कोहलीImage Credit source: social media
| Updated on: Nov 05, 2024 | 9:37 AM
Share

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कप्तान असलेला विराट कोहली याला वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्याचे जगभरात लाखो चाहते आहेत. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही त्याला खूप प्रेम मिळतं. त्याच्यासोबत एक फोटो, सेल्फी काढण्यासाठी चाहते अगदी आतूर असतात. भारतीय क्रिकेट जगतात कोहलीच्या नावाचा जो दबदबा आहे , तो त्याने अथक मेहनतीने कमावला आहे. बॅटिंग असो किंवा फिल्डींग, मैदानावर तो अतिशय आक्रमक अंदाजात खेळताना दिसतो. पण पर्सनल आयुष्यात तो तितकाच शांत, खेळकर, मजेच्या मूडमध्ये दिसतो. सोशल मीडियावरही त्याचे कोट्यवधी फॉलोअर्स असून त्याच्या फोटो, पोस्ट्स, व्हिडीोवर लाईक्स , कमेंट्सचा अक्षरश: वर्षाव होतो.

आज याच किंग कोहलीचा 36 वा वाढदिवस आहे. त्याच्या चाहत्यांसाठी देखील आजचा दिवस खूप स्पेशल असून अनेक जण त्याचा फोटो पोस्ट करत त्याला शुभेच्छा देताना दिसतोय. मैदानावर तूफान फटकेबाजू करणारा विराट कमाईच्या बाबतीतही अव्वल आहे. त्याचे एकूण नेटवर्थ, संपत्ती किती आहे, जाणून घेऊया.

कोहलीकडे किती आहे संपत्ती ?

भारतीय क्रिकेट विश्वातील मोठं नाव असलेला विराट कोहली याची सर्वत्र चर्चा असते. सध्याच्या काळाता तो कमाईच्या बाबतीत जगभरातील श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीत वरच्या स्थानावर आहे. तो एखाद्या सेलिब्रिटीपेक्षाही अधिक कमाई करताना दिसतो. त्याची एकूण संपत्ती 1050 कोटी रुपयांच्या आसपास आहे. 2024 मध्ये विराट कोहलीला सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेटरचा टॅग मिळाला होता. मात्र नुकताच अजय जडेजा हा त्याला मागे टाकून सर्वात श्रीमंत क्रिकेटर बनलाय.

12 ऑक्टोबर 2024 रोजी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर, महाराजा शत्रुशल्यसिंहजी दौलतसिंहजी यांनी अजय जाडेडा याला जामनगर रॉयल सिंहासनाचा वारस म्हणून घोषित केले. त्यामुळे आता जामसाहेब बनताच जडेजाची एकूण संपत्ती 1450 कोटींपेक्षा अधिक झाली आहे. आता तो भारतातल सर्वात श्रीमंत खेळाडू बनला आहे. त्याने संपत्तीच्या बाबतीत कोहलीलाही मागे टाकलंय.

विराट कुठून करतो कमाई ?

विराट कोहलीच्या कमाईचा मुख्य स्त्रोत क्रिकेट आहे. टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळताना कोहलीला कसोटीसाठी 15 लाख रुपये, वनडेसाठी 6 रुपये आणि टी-20साठी 3 लाख रुपये मिळतात. पण 2024 टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावल्यानंतर त्याने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. कोहलीला बीसीसीआयच्या वार्षिक करारातून 7 कोटी रुपये मिळतात, तर आयपीएलमध्ये त्याचा पगार 15 कोटींहून अधिक आहे. याशिवाय, तो ब्रँड एंडोर्समेंटमधून भरपूर पैसे कमावतो.

क्रिकेटव्यतिरिक्त कमाई कुठून ?

कोहली अनेकदा त्याच्या सोशल मीडियावर ब्रँड एंडोर्समेंट करताना पोस्ट किंवा व्हिडिओ शेअर करताना दिसतो. यामध्ये त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्माही त्याच्यासोबत दिसते. किंग कोहलीचे मुंबईत आलिशान घर असून तो कुटुंबासोबत राहतो. कोहलीच्या घराची किंमत 34 कोटी रुपये आहे. एवढंच नव्हे तर एनसीआरच्या गुरुग्राममध्ये त्याची प्रॉपर्टी असून त्याची किंमत 100 कोटींच्या आसपास असल्याचे समजते.

या कंपन्यांमध्ये गुंतवणूक

विराटने अनेक कपंन्यामध्येही गुंतवणूक केली असून तेथून त्याना चांगली रिटर्न मि तात. मान्यवर, एमपीएल, पेप्सी, फिलिप्, फार्स्टट्रैक, बूस्ट, ऑडी, एमआरएफ, हीरो, Puma अशा अनेक ब्रांड्सच्या जाहिराती करून विराट बक्कळ कमाई करतो. तर त्याने Blue Tribe, Chisel Fitness, Nueva, Sport Convo आणि Digit सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूकही केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

आलिशान कारचा मालक आहे विराट

विराट कोहली अतिशय आलिशान आयुष्य जगतो. त्याच्याकडे एकाहून एक सरस, आलिसान कारही आहेत. रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडे Audi Q7 (70 ते 80 लाख रुपये), Audi RS5 (जवळपास 1.1 कोटी रुपये), Audi R8 LMX (जवळपास 2.9 कोटी रुपये), Land Rover Vogue अशा अनेक आलिशान कार आहेत.

कोहलीची फॅमिली

11 डिसेंबर 201 7मध्ये विराट कोहलीने अभिनेत्री अनुष्का शर्माशी शानदार सोहळ्याच लग्न केलं. ते दोघं उत्तम आयुष्य जगतात. त्यांना वामिका ही मुलगी आणि अकाय हा मुलगा आहे. विराट- अनुष्का सोशल मीडियावर बरेच ॲक्टिव्ह असतात, पोसट्ही करतात. पण मुलांना मात्र त्यांनी मीडियापासून दूरच ठेवलं आहे, त्यांचा चेहराही ते दाखवत नाही की जास्त फोटो पोस्ट करत नाहीत.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.