AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मत्स्यपालनाच्या सर्वोत्तम 5 टीप्स अन् जाणून घ्या सापळा लावण्याचे महत्वही

शेतीच्या जोडव्यवसायाला चालना देण्यासाठी आणि मासे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारेही विविध प्रकारच्या योजना चालवत आहेत. मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ होत आहे. त्यामुळे या व्यवसयाविषयी सर्वकाही माहित असणे आवश्यक आहे.

मत्स्यपालनाच्या सर्वोत्तम 5 टीप्स अन् जाणून घ्या सापळा लावण्याचे महत्वही
मासेमारी
| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 3:52 PM
Share

मुंबई : शेती बरोबरच सध्या तरुणाईचा कल हा या मुख्य व्यवसयाशी निगडीत असलेल्या व्यवसयाकडेही आहे. त्यामधीलच एक म्हणजे (Fisheries) मत्स्यपालन व्यवसाय. यामध्ये (advice to businessmen) माशांचे उत्पादन वाढवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा शोध लावला जात आहे. एवढेच नाही तर मासे पकडण्याचे तंत्रही काळाच्या ओघात बदलत आहे. या शेतीच्या जोडव्यवसायाला चालना देण्यासाठी आणि मासे शेतकऱ्यांना प्रोत्साहन (help of the government) देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारेही विविध प्रकारच्या योजना चालवत आहेत. मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ होत आहे. त्यामुळे या व्यवसयाविषयी सर्वकाही माहित असणे आवश्यक आहे. ज्याच्यामुळे उत्पादनात वाढ होईल आणि व्यवसायिकाची आर्थिक प्रगती. त्याच अनुशंगाने आपण सापळा लावण्याचे महत्वही जाणून घेणार आहोत.

मत्स्यव्यवसाय वाढीबरोबरच तो योग्य दिशेने असणे आवश्यक आहे.अन्यथा शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. मासे पाळणाऱ्या शेतकऱ्यांना वेळोवेळी तलावाचा दर्जा राखावाच लागतो. पाण्याची तपासणी करावी लागते. त्याचबरोबर वेळोवेळी तलावात जाळे चालवावे. कारण याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते ज्यामुळे इतर समस्या उद्भवतात. तलावाची गुणवत्ता राखण्यासाठी वेळोवेळी तलावात जाळ्या चालवणे खूप महत्वाचे आहे.

कोणते जाळे फायदेशीर ठरणार आहे?

मासे तपासण्यासाठी वेळोवेळी फेकणारा सापळा वापरला जातो. तसेच संपूर्ण तलावात दोन प्रकारच्या जाळ्या ह्या कायमस्वरुपी असतात. यामध्ये नायलॉनचे जाळे आहे, जे डासांच्या जाळ्यासारखे आहे. चॅट ट्रॅप म्हणूनही ओळखले जाते. या जाळीतील छिद्र ही लहान असल्याने त्याचा वापर करण्यासाठी मनुष्यबळ अधिकचे लागते. तर दुसरे म्हणजे ताना नेट. यामधील छिद्रे मोठी आहेत. त्यामुळे धावणं सोपं आहे. तलावाच्या आकारानुसार याचा वापर कमी माणसांनाही करता येतो.

सापळा चालवताना ह्या गोष्टी आहेत महत्वाच्या

जर सापळ्याचा उपयोग एकाच तलावासाठी होणार असेल तर जास्त अडचणी निर्माण होत नाहीत. पण जर हेच जाळे दुसऱ्या तलावात चालवले तर मात्र समस्या निर्माण होऊ शकतात. कारण दुसऱ्या तलावात असणारे तलावसंसर्ग किंवा कीटकअंडी ही या सापळ्यात अडकू शकतात. ज्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. त्यासाठी जाळी चालवण्यापूर्वी मीठ किंवा पोटॅशियम परमॅग्नेट द्रावणात जाळी बुडवावी. जेणेकरून सर्व संसर्ग दूर होतात. या बारीक बाबी असल्या तरी महत्वाच्या आहेत. याकडे व्यवसायिकांनी लक्ष देणे तेवढेच गरजेचे आहे.

सापळा फिरवण्याचे काय आहेत फायदे

सापळा चालवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे मासे तलावाच्या आत धावतात, ज्यामुळे त्यांचे पचन सुधारते, चांगले आरोग्य टिकून जाते, त्यांची वाढ चांगली होते. दुसरा फायदा म्हणजे सापळे चालवल्याने माशांची वाढ किती झाली आहे याचा अंदाज बांधता येतो. काढणी केलेल्या माशांच्या प्रजाती तलावात आहेत की नाही हे देखील यातून दिसून येते. त्याचबरोबर माशांमध्ये कोणताही संसर्ग झालेला नाही याची माहितीही मिळते. तलावाची साफसफाई करण्याबरोबरच तलावातून परजीवी नष्ट होतात. त्यामुळे महिन्यातून किमान दोन वेळेस तरी सापळे फिरवणे गरजेचे आहे. (5 Important Things About Fisheries And Know The Importance of Setting Traps)

संबंधित बातम्या :

…यामुळे वाढली लातूरच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक, काय आहेत कारण?

सोयाबीनच्या दरासाठी आंदोलन करण्याची नामुष्की ; परळीत विम्यासाठी संघर्ष दिंडी

ऊस बिलातून वीज बिलाची होणार, साखर आयुक्तांचे ‘या’ पाच जिल्ह्यातील कारखान्यांना पत्र

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.