हे ही माहिती असू द्या 7/12 उताऱ्यावर वारसाची नोंद करतात कशी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

आपण दैनंदिन व्यवहारामध्ये अगदी सहज म्हणतो की वारसा हक्काने जमिन मिळाली. मात्र, आजही वारसा हक्काची नोंद करायची कशी याची अनेकांना माहिती नसते. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या फक्त आपण ऐकूण आहोत. त्यापैकीच एक म्हणजे 7/12 उताऱ्यावर वारसाची नोंद करायची कशी ?

हे ही माहिती असू द्या 7/12 उताऱ्यावर वारसाची नोंद करतात कशी? जाणून घ्या संपूर्ण माहिती
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 11:25 AM

लातूर : आपण दैनंदिन व्यवहारामध्ये अगदी सहज म्हणतो की वारसा हक्काने  (Farm land) जमिन मिळाली. मात्र, आजही वारसा हक्काची नोंद करायची कशी याची अनेकांना माहिती नसते. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या फक्त आपण ऐकूण आहोत. त्यापैकीच एक म्हणजे 7/12 उताऱ्यावर वारसाची नोंद करायची कशी ? आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत. त्यामुळे अनेकांना याचा फायदा होणार आहे.

वारसा हक्काची तरतूद ही कायद्यातच करण्यात आलेली आहे. जमिन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 149 प्रमाणे हे तयार करण्यात आले आहे. ज्यावेळी वडिलोपार्जित संपत्ती नावावर करायची असते तेव्हा आजोबांच्याकडून वडिलांना आणि वडिलांकडून मुलाला संपत्ती मिळते. ज्यावेळी वडिलांचे निधन होते, त्यानंतर त्यांची संपत्ती वारसदाराला मिळते. यासाठी बरेच कागदोपत्री व्यवहार करावे लागतात.

अशी आहे प्रक्रिया

* सर्वात आधी मृत्यू झालेल्या व्यक्तींचा मृत्यू दाखला काढणे आवश्यक आहे. खेडेगावात हा दाखला ग्रामपंचायतमध्ये मिळतो, शहरी भागात हा दाखला नगरपालिका, महानगरपालिका जन्म-मृत्यू विभागात मिळतो.

*त्याआधी मृत्यू झालेल्या व्यक्तीची नोंद होणे आवश्यक असते. 3 महिन्याच्या आत वारसा नोंदणी करण्यासाठी देणे आवश्यक आहे.

*यासाठी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे निधन किती तारखेस झाले, त्या व्यक्तीच्या नावावर कोणती जमीन आहे, एकूण वारसदारांची संख्या किती या सर्व गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.

*वारसा नोंद करताना निधन झालेल्या व्यक्तीचा मृत्यू दाखला काढून वारसा नोंदणीसाठी कर्ज करावा. रजिस्टरमध्ये नोंद केल्यानंतर गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि काही प्रतिष्ठित नागरिकांचे विचार घेऊन अर्जामध्ये लिहलेल्या माहितीची चौकशी केली जाते.

*वारसा फेरफार ठराव मंजूर करून नोंद घेतली जाते. त्यानंतर सर्व वारसदारांना नोटीस दिली जाते. 15 दिवसात याबाबत कायदेशीर आदेश काढला जातो. त्यानंतर वारसाची नोंद केली जाते. यासाठी लागणारी कागदपत्रे: मृत्यू प्रमाणपत्र, तलाठी अहवाल.

वारसा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे: रेशन कार्ड प्रत, विहित नमुन्यातील कोर्ट फी स्टॅम्प असलेल्या अर्ज आणि शपथपत्र, वारस हक्क प्रमाणपत्र आणि नॉमिनी.

बँक, विमा रक्कम इ. बाबत नॉमिनी (मृत्यूनंतर संबंधित खातेदाराची रक्कम ज्या व्यक्तीकडे देण्यात यावी असे लिहले असेल तर त्या व्यक्तीला ती रक्कम मिळू शकते.)

मृत व्यक्तीच्या नावावरील 8 अ चे उतारे, वारसदाराचे पत्ता इत्यादी. वारसदाराची नोंद करताना त्या व्यक्तीच्या धर्मानुसार वारसा कायद्याचे नियम लागू पडतात. अशा प्रकारे वारसाची नोंद केली जाते. (7/12 How do children get recorded on the passage? Know all the information)

संबंधित बातम्या :

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या 10 दिवसांसाठी बंद मात्र, ‘या’ बाजार समित्यांचे व्यवहार सुरुच

शेतकऱ्यांचा शेतीमाल आता हवाई मार्गाने बाजारपेठेत, कृषी उडान योजनेला सुरवात

उलटी गणती सुरु…! आवक घटूनही कांद्याचे दर कोसळलेच

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.