AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कशामुळे होतेय मोसंबीची फळगळती ? ; असे करा व्यवस्थापन

ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत फळगळीचे प्रमाण वाढलेले आहे. रसशोषक पतंग, फळमाशी, बुरशी यामुळे फळगळ सुरु आहे. फायटोप्थाोरा बुरशीमुळेच मोसंबी आणि लिंबुवर्गीय फळपिकांमध्ये डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे उत्पादनात तर घट होणार आहे. पण ऐन फळलागवडीच्या दरम्यानच रोगराईचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

कशामुळे होतेय मोसंबीची फळगळती ? ; असे करा व्यवस्थापन
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 10:41 AM
Share

लातूर : खरीपाचे नुकसान पावसामुळे झाले आहे तर आता फळबागांना किडीचा प्रादुर्भाव होत आहे. ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत फळगळीचे प्रमाण वाढलेले आहे. रसशोषक पतंग, फळमाशी, बुरशी यामुळे फळगळ सुरु आहे. फायटोप्थाोरा बुरशीमुळेच मोसंबी आणि लिंबुवर्गीय फळपिकांमध्ये डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे उत्पादनात तर घट होणार आहे. पण ऐन फळलागवडीच्या दरम्यानच रोगराईचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे फळबागायत शेतकरीही अडचणीत आहेत. त्यामुळे योग्य वेळी व्यवस्थापन करण्याचा सल्ला परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डॅा. संजय बंटेवाड, डॅा. अनंत लाड, संजोग बोकण, डॅा. अनंत लाड यांनी दिला आहे.

काय आहेत डिंक्या रोगाची लक्षणे

*डिंक्या हा रोग फायटोप्थोरा या बुरशीमेळच होतो. ही बुरशी जमिनीत सुप्तावस्थेत राहते. जमिनीमध्ये ओलावा आणि दमट वातावरण निर्माण झाले की याचा प्रादुर्भाव वाढतो. रोपवाटिकेत जर याचा प्रादुर्भाव झाला तर रोपांची मुळेच कुजतात. त्यामुळे याची वाढ खुंटते. * बागेमध्ये जमिनीलगतचे खोड, फांद्या आणि फळास याची लागण होते. एवढेच नाही तर काळाच्या ओघात फळाच्या पानावरही याचा परिणाम होतो. पानगळ होऊन पुन्हा फांद्यादेखील वाळतात. या रोगाची तीव्रता जास्त असल्याने अखेर झाड देखील वाळते. त्यामुळे फळबागायत शेतकऱ्यांनी योग्यच काळजी घेतली नाही तर उत्पादनात तर घट होणारच आहे पण बाग देखीव उध्वस्त होण्याचा धोका आहे.

डिंक्या रोगाचे व्यवस्थापन कसे करायचे?

फळबागेची लागवड करतानाच रोगप्रतिकार खुंटाचा वापर करावा लागणार आहे. शिवाय चुनखडी असलेल्या क्षेत्रावर याची लागवड करु नये. जमिनीत पाणी साचू नये पाण्याचा निचरा होईल अशाच जमिनीवर लागवड करणे गरजेचे आहे. पाणी देण्यासाठी ठिबकचाच वापर फायद्याचा राहणार आहे. तर ऑक्टोंबर महिन्यात पावसाने उघडीप म्हणजे सध्याच्या वातावरणात एक टक्का बोरेर्डोपेस्ट, एक किलो मोरचूद, एक किलो कळीचा चुना आणि 10 लिटर पाणी हे झाडाच्या खोडावर जमिनीपासून तीन ते चार फूट ऊंचीवर लावावे. हे लावण्यापूर्वी मात्र, रोगग्रस्त फांद्या, तडकलेले साल व झाडावरील डिंक हा काढून टाकला पाहिजे. झाडावर डिंकाचा प्रादुर्भाव जास्त असल्यास फोसास्टाइल एएल 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून 40 दिवसाच्या अंतराने दोन वेळेस फवारणी करावी लागणार आहे.

धोका फळमाशीचा

फळमाशी ही झाडाच्या खोडात अंडी घालते. अंड्यातील अळ्या ह्या फळाचा गरच खातात. एवढेच नाही तर माशीने तयार केलेल्या छिद्रातून सुक्ष्म किटक हे फळात जातात व फळ हे सडायला लागते. सडलेले फळ हे खाली पडते.

कसे करायचे व्यवस्थापन ?

व्यवस्थापन करण्यापूर्वी जमिनीवर पडलेली फळे ही लागलीच नष्ट करावीत. जेणे करुन इतर झाडांना त्याचा प्रादुर्भाव होणार नाही. फळमाशी ही झाडाखाली जमिनीत कोषावस्थेत असते. त्यामुळे उन्हाळ्यात जमिनीची नांगरण करुन कोष नष्ट करावे लागणार आहेत. या करिता 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी लागणीर आहे. (Advice from agronomists in Parbhani vidyapatha to manage pest infestation, management on Mosambi orchard)

संबंधित बातम्या :

केळीमध्येही बुरशीजन्य रोग, वेळीच काळजी घ्या अन्यथा उत्पादनावर परिणाम

नागपूरी संत्री सातासमुद्रापार, मोसंबीच्या निर्यातीचाही मार्ग मोकळा

‘ई-पीक पाहणी’ न केल्यास काय होणार ? मुदतीमध्ये आणखीन वाढ

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.