शेतकऱ्यांनो चिंता सोडा, आता शेतीमालाचे बाजारभाव तुमच्या मोबाईवरच, कसे ते पहा..!

बाजारभाव जाणून घेण्यासाठी कुठे मार्केटला जाण्याची गरज नाही किंवा कुणाला विचारण्याचीही गरज नाही. कारण तुमच्या शेजारच्याच नाही तर देशभरातील बाजारपेठतील शेतीमालाचे दर जाणून घेऊ शकतात. 'agmarknet.gov.in' या वेबसाईटवर माहिती मिळणार आहे.

शेतकऱ्यांनो चिंता सोडा, आता शेतीमालाचे बाजारभाव तुमच्या मोबाईवरच, कसे ते पहा..!
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 11:59 AM

लातूर : शेतीमालाची काढणी करण्यापूर्वीच शेतकऱ्यांना चिंता असते ती ( Agricultural prices) बाजारभावाची. मात्र, आजही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याची अचूक माहिती होत नाही. त्यामुळे ज्याने शेतीमाल बाजार पेठेत विक्री केला आहे किंवा शेतीमालाची देवाण-घेवाण करणाऱ्यालाच याची माहिती विचारावी लागते. याबाबत अचूक माहिती ही ( farmers) शेतकऱ्याला मिळतच नाही. मात्र, बाजारभाव जाणून घेण्यासाठी कुठे मार्केटला जाण्याची गरज नाही किंवा कुणाला विचारण्याचीही गरज नाही. कारण तुमच्या शेजारच्याच नाही तर देशभरातील बाजारपेठतील शेतीमालाचे दर जाणून घेऊ शकतात. ‘agmarknet.gov.in’ या वेबसाईटवर माहिती मिळणार आहे.

शेती मालाचे बाजारभाव कसे पहायचे?

  • शेतकऱ्यांना सर्वात प्रथम ‘agmarknet.gov.in’असं सर्च करायचे आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसमोर नविन वेबसाईट ओपन होईल. डावीकडे सर्च हा पर्याय दिसेल. यामध्ये price हा रकाना दिसेल तो जशाच्या तसा ठेवायचा आहे. त्यानंतर commodity या रकान्यावर क्लिक करुन तुम्हाला ज्या पिकांचा बाजारभाव पहायचे आहे त्या पिकाचे नाव सिलेक्ट करायचे आहे.
  • समजा तुम्हाला कापूस या पिकाचा भाव जाणून घ्यायचा आहे. पुढे state निवडायचे आहे. त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे. यानंतर समोर असलेल्या मार्केट या रकान्यात तुमच्या जवळची बाजारपेठ निवडायची आहे. यानंतर कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत भाव पहायचे आहेत ती तारीख निवडायची आहे. एकदा तारीख टाकून झाली की, Go या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्ही तुम्ही निवडलेल्या बाजारपेठेतील त्या पिकाचे बाजारभाव समोर येतील. यामध्ये जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती भाव मिळाला तर सर्वसाधारण काय दर होता याचीही माहितीही शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे या ‘agmarknet.gov.in’अधिकृत वेबसाईटवर राज्य, जिल्हा बाजार समिती आणि पाहिजे असलेल्या शेतमालाचा भाव जाणून घेऊ शकता.

अधिकृत वेबसाईटवर सविस्तर माहिती

अनेक वेळा दिवसागणिस शेतीमालाचे दर हे बदलतात. सध्या सोयाबीनच्या दराबाबत असेत होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दराची माहिती घेऊन शेतीमाल विक्री सहज शक्य होते. यामध्ये केवळ गरज आहे ती योग्य माहितीची. सराकारने शेतकऱ्यांची सोय व्हावी म्हणूनच या ‘agmarknet.gov.in’ही अधिकृत वेबसाईट निर्माण केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक तर होत नाही पण आपल्या मालाला कोणता योग्य दर आहे याची माहिती घेऊन त्याची विक्री ही करता येते.

संबंधित बातम्या :

गुजरात सरकारने शेतकऱ्यांसाठी जे केले, ते महाराष्ट्र सरकारला जमणार का?

अवकाळीने दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी ?

Farm Laws: शेतकरी संघटना उर्वरित प्रश्नांसाठी पंतप्रधानांना खुलं पत्र लिहिणार, 27 नोव्हेंबरला आंदोलनावर निर्णय

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.