Latur Market : अखेर शेतकऱ्यांनी घेतला निर्णय, दोन दिवसांमध्ये सोयाबीन-कापसामुळे बदलले बाजारपेठेतले चित्र

गेल्या दोन दिवस तर खरिपातील पिकांसाठी महत्वाचे राहिलेले आहेत. कापसाचे दर 10 हजार प्रति क्विंटलच्या वाटेवर आहेत तर सोयाबीनचे दर सुधारून 6 हजार 350 वर स्थिरावले आहेत. त्यामुळे सर्वकाही मनासारखे होत असल्याने साठवणूकीतले सोयाबीन आता बाजारपेठेकडे दाखल होत आहे.

Latur Market : अखेर शेतकऱ्यांनी घेतला निर्णय, दोन दिवसांमध्ये सोयाबीन-कापसामुळे बदलले बाजारपेठेतले चित्र
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 2:04 PM

लातूर : नववर्षाची सुरवात शेतकऱ्यांसाठी चांगली झालेली आहे. सुरवातीलाच कापसाला विक्रमी दर मिळालेले आहेत तर दुसरीकडे (Stable soybean Rate) सोयाबीनच्या दरातही कासवगतीने का होईना वाढ होत आहे. त्यामुळे बाजारपेठेतले चित्रच बदलून गेले आहे. गेल्या दोन दिवस तर (Kharif Season) खरिपातील पिकांसाठी महत्वाचे राहिलेले आहेत. (Cotton Rate) कापसाचे दर 10 हजार प्रति क्विंटलच्या वाटेवर आहेत तर सोयाबीनचे दर सुधारून 6 हजार 350 वर स्थिरावले आहेत. त्यामुळे सर्वकाही मनासारखे होत असल्याने साठवणूकीतले सोयाबीन आता बाजारपेठेकडे दाखल होत आहे. दोन्हीही शेतीमालाला दर चांगला मिळत असल्याने बाजारपेठेत वर्दळ निर्माण झाली असून बुधवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक झाली आहे.

सोयाबीन-कापसासाठी शेतकऱ्यांची भूमिकाच योग्य

खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस ही मुख्य पिके आहेत. कापसाचे क्षेत्र हे घटले असले तरी यंदा दर अधिकचे राहिल्याने समाधानकारक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहेत. मात्र, या दोन्ही शेतीमालाचे दर टिकवून ठेवण्यामध्ये शेतकऱ्यांचीच भूमिका ही महत्वाची राहिलेली आहे. कमी दर असताना धान्याची साठणूक आणि दर प्रमाणात मिळाले तरी टप्प्याटप्याने विक्री हीच भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने मागणीनुसार पुरवठा होत गेला. त्यामुळे सोयाबीन आणि कापसाचे दर हे टिकून राहिलेले आहेत. कापसाला 9 हजार 900 तर सोयाबीनला सरासरी 6 हजार 300 चा दर मिळत आहे.

दर वाढीचा परिणाम शेतीमालाच्या आवकवर

बाजारपेठेचे सुत्र शेतकऱ्यांनीही अवगत करुन घेतलेले आहे. दर घटलेले असताना शेतीमालाची आवक आणि दर वाढले तरी प्रमाणातच विक्री करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला होता. त्यामुळेच आता दरात वाढ झाली आहे. या दर वाढीचा परिणाम थेट बाजारपेठेवर दिसून येत आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारपर्यंत 14 हजार पोत्यांची सर्वाधिक आवक झाली होती. आता दर स्थिर असल्याने बुधवारी थेट आवक ही 19 हजार पोत्यांवर गेली होती. कापसाच्या आवकमध्येही वाढ झाली आहे. नंदुरबार येथील खरेदी केंद्रावर दिवसाकाठी 2 हजार क्विंटलचा कापूस दाखल होत आहे.

तरीही शेतकऱ्यांनी योग्यच भूमिका घ्यावी

आता दर वाढले म्हणून अचानक आवक वाढली तर त्याचे परिणाम या दोन्ही पिकांच्या दरावरच होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमालाची विक्री करावी पण टप्प्याटप्प्याने असा सल्ला कृषितज्ञ देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडे मालही राहणार आहे तर मागणीनुसार त्याची विक्री करण्याचा पर्यायही खुला राहणार आहे. सोयाबीन, कापूस बरोबर आता तुरीची आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. एकंदरीत हंगामाचा शेवट गोड होत आहे हेच शेतकऱ्यांसाठी समाधानकारक आहे.

संबंधित बातम्या :

तुरीच्या उत्पादनात विक्रमी वाढ, जालन्यातील उत्पादकता नागपूरच्या बरोबरीने, कशामुळे झाली ही क्रांती?

सर्जा-राजा : ‘सर्जा’मुळे घरात समृध्दी, शेतकऱ्याने जाणीव ठेऊन केला दशक्रिया विधी

शेती मालाच्या योग्य दरासाठी सोलापूर विद्यापीठाचे संशोधन, नेमके काय आहे सॅाफ्टवेअर, वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.