AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandara : कृषी विभाग तत्पर तरीही खत विक्रीत अनियमितता, भंडाऱ्यात 6 कृषी केंद्रांचे परवानेच निलंबित

खरीप हंगामात खतासाठी शेतकऱ्यांची भटकंती ही सुरु होती. शिवाय कृषी विभागाने योग्य नियोजनही केले होते. पण स्थानिक पातळीवर विक्रेत्यांनी खतांचा कृत्रिम टंचाई दाखवून अधिकच्या किंमतीमध्ये विक्री केली होती. भंडारा जिल्ह्यात 14 खत कंपन्याचा 163 मेट्रिक टन खतसाठा गोठवण्यात आल्याचे समोर आले आहे.

Bhandara : कृषी विभाग तत्पर तरीही खत विक्रीत अनियमितता, भंडाऱ्यात 6 कृषी केंद्रांचे परवानेच निलंबित
रासायनिक खत
| Updated on: Sep 11, 2022 | 6:51 PM
Share

भंडारा : यंदा (Kharif Season) खरीप हंगामाच्या तोंडावर मागणीच्या तुलनेत (Fertilizer) खताचा पुरवठा हा तसा कमीच झाला होता. याकरिता जागतिक स्तरावरील परस्थिती कारणीभूत असली (Central Government) केंद्राने खत पुरवठ्याबाबत योग्य ती धोरणे आखली होती. त्यानुसार जिल्ह्याच्या ठिकाणी पुरवठा तर झाला पण विक्रीमधील अनियमिततेवर प्रशासनाला ब्रेक लावता आला नाही. आतापर्यंत अकोला, अमरावती, लातूर या ठिकाणी खताचा कृत्रिम तुटवडा किंवा नियमाप्रमाणे विक्री न करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई झाली आहे. आता भंडाऱ्यातील विक्रेत्यांनी खतसाठा गोठवल्याने 6 कृषी सेवा केंद्रांचे परवानेच निलंबित करण्यात आले आहेत.

163 मेट्रिक टन खताचा घोटाळा

खरीप हंगामात खतासाठी शेतकऱ्यांची भटकंती ही सुरु होती. शिवाय कृषी विभागाने योग्य नियोजनही केले होते. पण स्थानिक पातळीवर विक्रेत्यांनी खतांचा कृत्रिम टंचाई दाखवून अधिकच्या किंमतीमध्ये विक्री केली होती. भंडारा जिल्ह्यात 14 खत कंपन्याचा 163 मेट्रिक टन खतसाठा गोठवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानुसार आता कारवाईला सुरवात झाली आहे.

परवाने निलंबित, कृषी विभागाची कारवाई

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील मुरमाडी येथील ईश्वरकर कृषी केंद्र, लाखनी येथील कृषी सेवा केंद्र, तुमसरे कृषी केंद्र, मानेगाव सडक येथील शेतकरी कृषी केंद्र, पिंपळगाव सडक येथील रामकृष्ण ट्रेडर्स, लाखोरी येथील बजरंग कृषी यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. आरसीएफ, पीपीएल, आयपीएल कोरोमंडल इंटरनॅशनल, चंबल फर्टिलायझर, इफको आदी कंपन्यांचे खत गोठवले आहे.

कृषी पथकामुळे प्रकरण उघडकीस

खरीप हंगामात खत विक्रीत अनियमितता होऊ नये म्हणून कृषी विभागाकडून पथकांची नेमणूक केली जाते. तालुक्यासाठी एक पथक नेमले जाते. त्यामुळे खताची टंचाई, शेतकऱ्यांची गैरसोय यासारख्या गोष्टींना आळा बसतो. लाखनी तालुक्यात झालेला गैरप्रकार यामुळेच उघडकीस आला आहे. पथकाच्या या कारवाईमुळे भविष्यात असे धाडस कोणी करणार नाही, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केलाय.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.