AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रब्बीची लगबग सुरुयं, मग कृषी विभागाचा सल्ला पाहूनच करा पेरणीचा श्रीगणेशा..!

रब्बीच्या पेरणीबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला दिला आहे. (Agricultural University Parbhani,) ज्यामाध्यमातून पेरणीची  (Sowing )आणि पीक जोपासण्याची माहिती शेतकऱ्यांना होणार आहे. पावसाने उघडीप दिल्याने खरीपातील कामे शेतकऱ्यांनी उरकून घेतली असून आता रब्बी हंगामाची लगबग पाहवयास मिळत आहे. त्याचअनुशंगाने कृषी विभागाचा हा सल्ला शेतकऱ्यांसाठी महत्वाचा राहणार आहे.

रब्बीची लगबग सुरुयं, मग कृषी विभागाचा सल्ला पाहूनच करा पेरणीचा श्रीगणेशा..!
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 1:39 PM
Share

लातूर : रत्नागिरी वगळता मान्सूने माघार घेतलेली आहे. यंदा बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झालेला आहे. मात्र, आता येथून पुढे वातावरण हे कोरडे राहणार असून शेतातील उभ्या पिकाबाबत आणि (Rabi Season) रब्बीच्या पेरणीबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला दिला आहे. (Agricultural University Parbhani,) ज्यामाध्यमातून पेरणीची  (Sowing )आणि पीक जोपासण्याची माहिती शेतकऱ्यांना होणार आहे. पावसाने उघडीप दिल्याने खरीपातील कामे शेतकऱ्यांनी उरकून घेतली असून आता रब्बी हंगामाची लगबग पाहवयास मिळत आहे. त्याचअनुशंगाने कृषी विभागाचा हा सल्ला शेतकऱ्यांसाठी महत्वाचा राहणार आहे.

रब्बीच्या पेरणीला उशिर झाला असला तरी त्याचा परिणाम हा उत्पादनावर होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपातील काढणी झालेल्या पिकाची वाळवण करुन साठवणूक करणे आवश्यक आहे. अन्यथा हे पीक पावसात भिजल्याने याला बुरशी लागण्याचा धोका संभावतो. खरीपातील केवळ कापूस आणि तूर हीच पिके वावरात असून त्यांच्या काढणीला आवधी आहे. तत्पूर्वी रब्बीसाठी मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषीतज्ञ डाकोरे सर यांचा काय सल्ला आहे ते आपण पाहू..

1) ऊस : ऊस पिकाच्या पुर्वहंगामाच्या लागवडीचा हंगाम आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीत वापसा झाल्यानंतरच लागवड करणे आवश्यक आहे. याकरिता निरा, निरा 262, फुले सावित्री यासारख्या वाणांची निवड करणे फायद्याचे राहणार आहे.

2) हरभरा : हरभरा हे रब्बीतील महत्वाचे पीक आहे. यंदा पोषक वातावरणामुळे हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. शिवाय कृषी विभागाकडूनही याकरिता प्रोत्साहीत केले जात आहे. त्यामुळे हरभऱ्याची पेरणी शेतकरी 10 नोव्हेंबरपर्यंतही करता येते. पेरणीसाठी विजय, विशाल, फुले ही जी कृषी विभागाने शिफारस केलेल्या वाणाचा उपयोग गरजेचा आहे. पेरणी करताना दोन ओळीत अंतर हे 30 सेंटीमीटर व दोन रोपातील अंतर हे 10 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. पेरणीपूर्वी बीजप्रक्रीया केल्यावर रोगकिडीचा प्रादुर्भाव हा कमी होतो. पेरणीनंतर 30 दिवसांनी पहिले पाणी देणे आवश्यक आहे.

3) रब्बी ज्वारी : रब्बी ज्वारीची पेरणी झाली की कमीत-कमी हे पीक 35 ते 40 दिवस तणविरहीत ठेवावे लागणार आहे. कारण एकदा का जर पिकात तण वाढले तर ते अन्नद्रव्य ही शोषून घेते वाढीमध्ये ते पीकाबरोबर स्पर्धा करते. त्यामुळे तणाचे नियंत्रण योग्य वेळी केले तरच उत्पादन वाढणार आहे.

4) गहू : गहू पेरणीला अद्याप अवकाश आहे. पण जमिनीत वापसा झाला की, भूमशागत महत्वाची आहे. गव्हाची पेरणी ही 1 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत करावी लागणार आहे. याकरीता जमिनीची मशागत करुन शेतजमिन ही तयार करुन ठेवावी लागणार आहे.

5) करडी पीक : करडी पिकाच्या उगवणीनंतर 10 ते 12 दिवसांनी त्याची विरळणी करणे आवश्यक आहे. कारण पीक जर दाट झाले तर अन्नद्रव्यासाठी स्पर्धा होते आणि करडीची वाढ खुंटते. शिवाय विरळणी करीत असताना रोगट व खराब झाडे ही उपटून टाकावी ज्यामुळे इतर पीकाला त्याची बाधा होणार नाही. दोन रोपातील अंतर हे 20 सेंटीमीटर ठेवावे.

सोयाबीन, कापसाची योग्य साठवणूक

खरीपातील सोयाबीन आणि कापसाच्या वेचणीची कामे झाली आहेत किंवा अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे सोयाबीनमधील आर्द्रतेचे प्रमाण कमी करण्यासाठी त्याला ऊनामध्ये वाळवणे आवश्यक आहे. तर कापसाची वेचणी ही सकाळी लवकर करावी कारण सकाळी हवेत आर्द्रता ही जास्त असते त्यामुले कापसाला काडी कचरा लागत नाही. शेतकऱ्यांनी अशा पध्दतीने रब्बी हंगामातील पीकांची पेरणी खरीपातील पिकांची काळजा घेतली तर नक्कीच फायदा होणार आहे.

संबंधित बातम्या :

 विम्यासाठी फळबागायत दार ‘वेटिंगवर’ या पर्यायांची अमलबजावणी करा अन् परतावा मिळवा

सोयाबीनच्या मागणीत वाढ पण दरात…? शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

फळ पिक विमा योजना अन् शेतकऱ्यांना कसा मिळतो परतावा

राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी.
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग.
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात.
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.