आता पावसाचा नव्हे, कमी तापमानाचा धोका, पिकांवर कोळी किडीचा प्रादुर्भाव

27 ऑक्टोंबरपासून 5 दिवस तापमान हे कमी राहणार आहे. किमान तापमान 17 ते 20 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाने वर्तवलेली आहे. या बदलत्या तापमानाचा परिणाम लिंबूवर्गीय पिकांवर होणार असल्याचे सांगितले आहे. तर रब्बी हंगामातील पूर्वमशागतीची कामे उरकून घेऊन त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

आता पावसाचा नव्हे, कमी तापमानाचा धोका, पिकांवर कोळी किडीचा प्रादुर्भाव
कोळी किडीचा प्रादुर्भाव
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 4:31 PM

हिंगोली : आतापर्यंत पावसाचा अंदाज जरी वर्तवण्यात आला तरी शेतकऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण होत होती. आता उद्यापासूनही हवामानात बदल होणार आहे पण तो कमी तापमानाचा. 27 ऑक्टोंबरपासून 5 दिवस तापमान हे कमी राहणार आहे. (Climate change forecast) किमान तापमान 17 ते 20 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाने वर्तवलेली आहे. या बदलत्या तापमानाचा परिणाम ( pests on crops, ) लिंबूवर्गीय पिकांवर होणार असल्याचे सांगितले आहे. तर रब्बी हंगामातील पूर्वमशागतीची कामे उरकून घेऊन त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

सध्या रब्बीचा हंगाम सुरु झाला आहे. त्याअनुशंगाने या दरम्यानच्या काळात बागायती हरभरा पिकाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे करुन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेरणीला सुरवात केली तर या हवामानामुळे वाढ जोमात होणार आहे. पेरणीपूर्वी बीजप्रक्रीया ही आवश्यक आहे. केवळ हरभराच नाही तर सर्वच पिकांसाठी ही बीजप्रक्रीया केल्यास पेरलेल्या बियाणला बुरशी लागणार नाही. त्यामुळे हरभऱ्याच्या बियाणास पीएसबी, रायझोबियम, जिवाणू संवर्धनाची आणि ट्रायकोडरर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रीया आवश्यक आहे. मात्र, वातावरणातील बदलाचा परिणाम हा लिंबीवर्गीय पिकांमध्ये कोळी किडीचा प्रादुर्भाव होणार आहे त्याचीही काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागणार आहे.

15 नोव्हेंबरपासून ऊस लागवडीस पोषक वातावरण

यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झालेला आहे. त्यामुळे ऊसाचे क्षेत्र हे गतवर्षीपेक्षा वाढणार आहे. शिवाय शेत मशागतीसाठी वेळही आहे. शेतकऱ्यांनी 15 नोव्हेंबरपासून ऊसाच्या लागवडीस सुरवात केली तरी योग्य वेळी उगवण होणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.

हळदीला कंदमाशीचा प्रादुर्भाव

बदलत्या वातावरणामुळे हळदीला कंदमाशीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. त्यामुळे क्विनालफॅास 25 टक्के, 20 मिली डायमिथोएट, 30 टक्के 10 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे आवश्यक आहे. शिवाय हळदीचे कंद हे मातीने झाकून ठेवणे आवश्यक आहे.

कोळी किडीवर उपाययोजना

लिंबूवर्गीय पिकांवर कोळ किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास डायकोफॅाल 18.5, ईसी, 2 मिली, प्रापरगाईट 20 ईसी, 1 मीली इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यता असल्यास दुसरी फवारणी ही 15 दिवसांनी करण्याचा सल्ला कृषी विद्यापीठाचे डॅा. कैलास डाखोरे यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

सोयाबीनच्या घसरत्या दरात शेतकऱ्यांनी ‘असे’ करावे नियोजन, कृषितज्ञांचा सल्ला

बीडमध्ये पीक विम्यासाठी आता संघर्ष दिंडी अन् जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामुक्काम

शेतीसाठी पाणी हवंय, मग ‘ही’ प्रक्रीया केल्यावरच मिळणार हक्काचे पाणी

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.