AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडमध्ये पीक विम्यासाठी आता संघर्ष दिंडी अन् जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामुक्काम

पीक विम्याचा प्रश्न दिवसेंदिवस रेंगाळत आहे शिवाय वेळेत परतावा देण्याची विमा कंपन्यांची मानसिकता नाही. यामुळे शेतकरी मेटाकूटीला आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य किसान सभा आता आक्रमक झाली असून शेतकरी प्रश्नी आंदोलन करणार आहे. याकरिता शुक्रवारी बीड जिल्ह्यातील सिरसाळा ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत संघर्ष दिंडी काढली जाणार आहे.

बीडमध्ये पीक विम्यासाठी आता संघर्ष दिंडी अन् जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामुक्काम
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 3:01 PM
Share

बीड : (Crop Insurance Company) पीक विम्याचा प्रश्न दिवसेंदिवस रेंगाळत आहे शिवाय वेळेत परतावा (Insurance Amount) देण्याची विमा कंपन्यांची मानसिकता नाही. यामुळे शेतकरी मेटाकूटीला आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य किसान सभा आता आक्रमक झाली असून शेतकरी प्रश्नी आंदोलन करणार आहे. याकरिता शुक्रवारी बीड जिल्ह्यातील सिरसाळा ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत (Conflict Dindi ) संघर्ष दिंडी काढली जाणार आहे. शिवाय या संघर्षयात्रेनंतरही शेतकऱ्यांच्या विम्याचा प्रश्न मार्गी लागत नसेल तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच महामुक्काम केला जाणार आहे.

जिल्ह्यात यंदाचाच नव्हे तर गेल्या दोन वर्षापासूनचा विमा परतावा हा कंपन्यांनी दिलेला नाही. 2020 चा पीकविमा मिळावा म्हणून जिल्ह्यातील गेवराई, परळी, बीड येथे आंदोलन करण्यात आले होते. एवढेच नाही तर पुणे येथील विमा कंपनीच्या कार्यालयातही आंदोलन पार पडले होते. अखेर उच्च न्यायालयाने आदेश देऊनही शेतकऱ्यांना विम्याचे वाटप करण्यात आलेले नाही. यंदाही पावसामुळे खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अद्यापही पंचनाम्यांचीच प्रक्रीया सुरु असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत केव्हा मिळणार असा सवाल आता किसान सभेने उपस्थित केला आहे. यंदाही राज्य सरकारने जाहीर केलेली मदत ही तुटपूंजी असून शेतकऱ्यांचे यामधून नुकसान भरुन निघणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन ही संघर्ष दिंडी शुक्रवारी काढण्यात येणार आहे.

पंचनाम्यातही अनियमितता

नुकसानीनंतर 72 तासाच्या आतमध्ये नुकसानीचे पंचनामे होणे अपेक्षित होते. मात्र, विमा कंपनीकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने पंचनामे हे वेळेत झालेले नाहीत. शिवाय नुकसानीची टक्केवारीही अंदाजेच ठरवण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. 72 तासाच्या आत नुकसानीच्या पूर्वसूचना शेतकऱ्यांकडून मागवून घेण्यात आल्या पण आज 15 दिवसानंतरही पंचनामे झालेले नाहीत. खरीपातील पिकांची काढणी झाली आता नुकसानीची टक्केवारी कशी ठरवण्यात येणार. शेतरकऱ्यांना मिळणारी मदत ही अंदाजेच दिली जाणार असल्याचा आरोप हा किसान सभेने केलेला आहे.

काय आहेत किसान सभेच्या मागण्या

सन 2020 सालीही अतिवृष्टीने खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या सर्व पिकांचा विमा तात्काळ जमा करावा, केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे 2020 चा खरीप हंगामातील पिक विमा मंजूर करण्यात यावा, शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू नये म्हणून साखर कारखाने हे पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात यावेत शिवाय एफआरपी रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. एफआरपी रक्कम ही एकरकमी मिळण्याच्या मागणीसाठी ही संघर्ष दिंडी काढण्यात येणार आहे.

दिवाळीपूर्वी मदतीचे आश्वासन

राज्यकृषी मंत्री दादा भुसे यांनी विमा कंपन्यांना दिवाळीपूर्वी किमान 25 टक्के नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे पंचनामेच पूर्ण झाले नाहीत त्या शेतकऱ्यांना मदत मिळणार तरी कशी असा सवाल उपस्थित होत आहे. 25 टक्के प्रमाणे त्यांनी 3 हजार कोटी रुपये वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, एकट्या परभणी जिल्ह्यात 1 लाख 25 हजार शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचेच बाकी राहिलेले आहेत. (Now kisan sabha struggle for crop insurance, agitation in Beed with farmers)

संबंधित बातम्या :

शेतीसाठी पाणी हवंय, मग ‘ही’ प्रक्रीया केल्यावरच मिळणार हक्काचे पाणी

पूर्वसूचना करुनही पंचनामे प्रलंबित, शेतकऱ्यांनो ‘ही’ काळजी घ्या तरच मिळेल नुकसानभरपाई

पेरणी यंत्र एक अन् फायदे अनेक, वेळेची बचत शिवाय उत्पादनात वाढ

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.