Monsoon : धो-धो बरसला पाऊस, राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये ओलांडली सरासरी, काय सांंगते हवामान विभागाची आकडेवारी?

सरासरीएवढा पाऊस झाला तरी वर्षभराचा प्रश्न मार्गी लागतो. 1 जून ते 17 ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत सरासरीपेक्षा 60 टक्के जास्तीचा पाऊस झाला असे चार जिल्हे राज्यामध्ये आहेत. यामध्ये मराठवाड्यातील नांदेड, नाशिक आणि विदर्भातील नागपूर आणि वर्ध्याचा समावेश होतो. याच चार जिल्ह्यामध्येच खरीपातील पिकांचे अधिकचे नुकसान झाले असून घरांची पडझडही येथेच जास्त झाली आहे.

Monsoon : धो-धो बरसला पाऊस, राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये ओलांडली सरासरी, काय सांंगते हवामान विभागाची आकडेवारी?
यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस
राजेंद्र खराडे

|

Aug 17, 2022 | 11:09 PM

मुंबई : यंदाच्या (Monsoon Rain) हंगामातील सुरवातीचा महिना वगळला तर राज्यात पावसाने अशी काय हजेरी लावली आहे की, जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये (Above average rainfall) सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झालेला आहे. याबाबत (Meteorological Department) हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे राज्यातील नांदेड जिल्ह्यामध्ये तेथील सरासरीपेक्षा तब्बल 80 टक्के अधिकचा पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस नोंदणीमध्ये मराठवाड्यातील जिल्ह्याचा समावेश झाला हे विशेषच आहे. दरवर्षी दुष्काळी परिसर म्हणून मराठवाड्याकडे पाहिले जाते पण यंदा पावसाने अशी काय कृपादृष्टी दाखवलेली आहे की मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये सर्वत्र पाणीच-पाणी अशीच स्थिती आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असले तरी पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा देखील प्रश्न मार्गी लागला आहे.

4 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 60 टक्के अधिक पाऊस

सरासरीएवढा पाऊस झाला तरी वर्षभराचा प्रश्न मार्गी लागतो. 1 जून ते 17 ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत सरासरीपेक्षा 60 टक्के जास्तीचा पाऊस झाला असे चार जिल्हे राज्यामध्ये आहेत. यामध्ये मराठवाड्यातील नांदेड, नाशिक आणि विदर्भातील नागपूर आणि वर्ध्याचा समावेश होतो. याच चार जिल्ह्यामध्येच खरीपातील पिकांचे अधिकचे नुकसान झाले असून घरांची पडझडही येथेच जास्त झाली आहे. जुलैमध्ये राज्यात सक्रिय झालेला पाऊस अद्यापही कायम आहे. अशीच परस्थिती राहिली तर यंदा विक्रमी पावसाची नोंद होणार आहे.

अतिवृष्टीच्या ठिकाणीच सरकारकडून पाहणी

हवामान विभागाने ज्या चार जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा 60 टक्के जास्तीचा पाऊस झाला आहे असे सांगितले त्याच जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील पाहणी केली होती. या जिल्ह्यातील स्थितीवरुनच सरकारला नुकसानीचा अंदाज आला होता. राज्यात तब्बल 15 लाखहून अधिकच्या हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यानुसार मदतीचे स्वरुपही स्पष्ट करण्यात आले आहे. आता पंचनामे झाले की मदत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस हा असा

जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा किती टक्के अधिक पाऊस झाला आहे याची आकडेवारी हवामान विभागाने समोर आणली आहे. यामध्ये 60 टक्केपेक्षा अधिक पाऊस हा चार जिल्ह्यामध्ये झाला आहे. 17 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा 20 टक्के अधिकचा पाऊस झाला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये सरासरीएवढा पाऊस झालेला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस हा एकाही जिल्ह्यामध्ये नाही हे विशेष

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें